कराड : ऐन सणासुदीच्या काळात उंडाळे येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे ATM वीजपुरवठ्याअभावी बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. परिसरातील ग्राहकांसाठी महत्त्वाची असलेली ATM सेवा बंद असूनही बँक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सणासुदीच्या काळात पैशांची गरज असताना ATM बंद असल्याने नागरिकांना पैसे काढण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि प्रवासाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
ATM सेवा नियमित आणि अखंडित ठेवण्याची जबाबदारी संबंधित बँक प्रशासनाची आहे. मग उंडाळेतील ATM वीजपुरवठ्याअभावी बंद असताना तातडीने पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
👉 बँक ऑफ महाराष्ट्र प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ATM सेवा सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.




