ताज्या बातम्या

शैक्षणिक व पर्यावरणपूरक कार्याची दखल; अमोघसिद्ध पाटील यांचा ‘आदर्श मुख्याध्यापक’ म्हणून गौरव

कामोठे, नवी मुंबई : पनवेल महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण आणि कामोठे टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दि. बा. पाटील विद्यालय, कामोठे येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पनवेल महानगरपालिकेचे महापौर श्री. नितीन पाटील आणि उपमहापौर सौ. प्रमिलाताई पाटील यांच्या हस्ते अमोघसिद्ध पाटील यांचा ‘आदर्श मुख्याध्यापक’ म्हणून गौरव करण्यात आला. त्यांच्या आजवरच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासोबतच पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अमोघसिद्ध पाटील यांच्या कार्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. त्यांच्या या सन्मानाबद्दल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले.

Scroll to Top