ताज्या बातम्या
महिला निर्मित उत्पादनांना दिवाळीपूर्वी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी  2 ते 5 नोव्हेंबरला भव्य ‘हिरकणी महोत्सव’मुंबईच्या ‘संगम प्रतिष्ठान’च्या स्वच्छता कार्याचा म्हैसूरमध्ये गौरव! म्हैसूर महानगरपालिका आयुक्तांसह प्रशासनाकडून कौतुक; धारावीतील ड्राय वेस्ट सेंटरला भेट देण्याची कोकाकोलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ग्वाहीयेळगाव-गोटेवाडी जलसंधारण तलावातील मोटारी बंद;पाणीसाठा मर्यादित; पुढील सहा ते सात महिने पाणी जपून वापरण्याचे आव्हानकराड बसस्थानकात पाण्याचा अपव्यय! एकीकडे पाणीटंचाईचे सावट, दुसरीकडे पाणी वाया जात असल्याचे चित्रउंडाळे परिसरात पाणीटंचाईचे सावट; जलसाठा जपण्याची गरज

महिला निर्मित उत्पादनांना दिवाळीपूर्वी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी  2 ते 5 नोव्हेंबरला भव्य ‘हिरकणी महोत्सव’

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांनी बनविलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध बाबींची खरेदी करण्यासाठी उत्सुक असणा-या नागरिकांना एकाच ठिकाणी विविध उपयोगी वस्तू मिळाव्यात यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने दिवाळी सणानिमित्त भव्यतम ‘हिरकणी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबईतील अनेक महिला व्यक्तिगत पातळीवर तसेच सामुहिकरित्या महिला बचत गट अथवा महिला समुहांच्या माध्यमातून विविध उत्पादनांची निर्मिती करीत असतात. या महिलांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक अशा हिरकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवामध्ये दिवाळी फराळ, सजावटीचे साहित्य, दागिने, कपडे आणि विविध खाद्यपदार्थ विकण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हेसाहित्य विक्री व प्रदर्शनाचे आयोजन दिवाळीपूर्वी दिनांक 2, 3, 4, 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत सेक्टर 26 नेरूळ येथील सुपरिचित गणपतशेठ तांडेल मैदान याठिकाणी करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील म्हणजेच दिघा ते बेलापूर क्षेत्रातील महिला, महिला बचत गट आणि वरील वस्तूंची निर्मिती किंवा विक्री करणाऱ्या महिला या प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊ शकतात. सहभाग नोंदणीसाठी आधार कार्ड, नवी मुंबईतील वास्तव्याचा पुरावा किंवा बचत गटाचे प्रमाणपत्र असणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.

या प्रदर्शनात स्टॉल उपलब्ध करून घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2026 असून इच्छुकांनी आपले अर्ज नवी मुंबई महानगरपालिका, समाजविकास विभाग, बेलापूर भवन, पहिला मजला, सेक्टर-11, सी.बी.डी. बेलापूर येथे जमा करावेत व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला बालकल्याण समिती सभापती श्रीम.सलुजा सुतार व उपसभापती श्रीम.रूपाली भगत यांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रदर्शनात सहभागाविषयक नोंदणीकरिता व अधिक माहितीसाठी श्री.दादासाहेब भोसले (बेलापूर व नेरुळ विभाग)-9372106976, श्री.मिथुन म्हात्रे (तुर्भे विभाग) – 9867231403, श्रीम. प्रियांका पाटील (वाशी विभाग) – 9082311440, श्री.सुंदर परदेशी (कोपरखैरणे व घणसोली विभाग) – 9594841666, श्री.दशरथ गंभिरे (ऐरोली व दिघा विभाग) – 9702309054 या समाजसेवकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Scroll to Top