कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे भौतिकशास्त्र संकुल संचालक व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. विकास बाबुराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ . जे .पी. नाईक आदर्श राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळी व उच्च शिक्षण विभागाचे संचालक प्रा. शैलेंद्र देवळांकर ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी ,पुणे विद्यापीठ माजी कुलगुरू प्रा नितीन करमाळकर उपस्थित होते 5 सप्टेंबर शिक्षक दिनी हा सन्मान सोहळा संपन्न झाला . यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले ज्ञानदेवतेच्या सेवेसाठी जिद्द, चिकाटी व नवसंकल्पना यांचा वापर करत अनेक संशोधन कार्य केले आहे. याचीच दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केला . त्यामुळे ते खऱ्या अर्थाने आदर्श ठरले आहेत. यापुढे देखील त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करावी अशा त्यांना मी शुभेच्छा देतो.
डॉ. विकास पाटील यांना २०२४-२०२५ साठी ‘इंडो-थाई रिचर्ड फेनमन पुरस्कार’ जाहीर झाला असून त्यांनी नॅनोमटेरिअल्स संशोधन क्षेत्रात नवा पैलू पाडला आहे. सोलापूर विद्यापीठाचा आणि देशाचा गौरव वाढवणारे काम करत त्यांनी आपल्या कार्याचे विस्तृत क्षेत्र नुकत्याच संपन्न केलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये चर्चेत आले आहेत.
उंडाळे तालुका कराड जिल्हा सातारा सारख्या दुर्गम भागातून प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन .
कराडच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज मधून १९९५ साली बीएससी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.एससी. (उपयुक्त इलेक्ट्रॉनिक्स) आणि २००३ मध्ये पीएच.डी. पूर्ण केली. अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ते दीपस्तंभ ठरेल आहेत.
डॉ. पाटील यांच्या नावावर २०५ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन लेख, १०४ परिषद प्रकाशने आणि ११ पुस्तके आहेत. त्यांचा एच-इंडेक्स ६० असून त्यांच्या संशोधन कार्याला हून अधिक सायटेशन्स 10540 मिळाली आहेत. त्यांना यूजीसी, बी आर एन एस , BIRAC डीएसटी, सीएसआयआर, डीआरडीओ यांसारख्या जागतिक संस्थांकडून ४.२२ कोटी रुपयांच्या संशोधन निधीचा लाभ घेतला आहे.
प्राध्यापक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांनी पीएचडी चे संशोधन कार्य पूर्ण केले आहे व सध्या पाच विद्यार्थी हे पीएचडी संशोधनाचे काम करत आहेत त्यांचे संशोधन प्रामुख्याने गॅस सेन्सर व सुपर कपॅसिटर या सध्या जगामध्ये अग्रेसर पणे जे संशोधनचालते त्या संशोधन एरियामध्ये त्यांचे काम चालते त्यांचे विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय संस्था यामध्ये संशोधक म्हणून काम करत आहेत त्यांनी आतापर्यंत 7 पेटंट मिळवलेले आहेत. त्याच्यामध्ये डिझाईन ,प्रोसेस, युटिलिटी व कॉपीराईट यांचा समावेश आहे.
त्यांनी गॅस सेन्सर सिस्टीम, इलेक्ट्रिकल रेजिस्ट्रीविटी मेजरमेंट ,हायड्रो थरमल युनिट यासारख्या टेक्नॉलॉजी तयार करून त्या इंडस्ट्री सोबत सामाजिक करार करून त्यांना हस्तांतरित केलेले आहेत
डॉ. पाटील यांचे कार्य क्षेत्र केवळ शैक्षणिक नव्हे, तर प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा देखील समावेश आहे. त्यांनी प्रभारी कुलगुरू, प्रभारी प्र-कुलगुरू ,संचालक ,अंतर्गत गुणवत्ता प्रदान , संचालक नव संशोधन नव उपक्रम व सहाचार्य मंडळ
म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. फ्रान्स, मलेशिया ,स्पेन, दक्षिण कोरिया आणि जर्मनी यांसारख्या देशांमध्ये सहभागी होऊन १२४ हून अधिक निमंत्रित व्याख्याने दिली आहेत.
डॉ. पाटील यांनी आधीच ‘सोलापूर विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ आणि ‘आंतरराष्ट्रीय नवोन्मेष व संशोधन उत्कृष्टता पुरस्कार’ प्राप्त केले आहेत. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
अकॅडमीक एक्सलन्स 2026 हा पहिला पुरस्कार देखील 5 सप्टेंबर 2026 रोजी विद्यापीठाने जाहीर केलेला आहे .स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एडी सायंटिफिक इंडेक्सतर्फे २०२१ ते २०२४ या सलग चार वर्षांत त्यांना ‘जगातील टॉप २% वैज्ञानिक’ म्हणून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सचे ते फेलो आहेत, तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.




