ताज्या बातम्या
महिला निर्मित उत्पादनांना दिवाळीपूर्वी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी  2 ते 5 नोव्हेंबरला भव्य ‘हिरकणी महोत्सव’मुंबईच्या ‘संगम प्रतिष्ठान’च्या स्वच्छता कार्याचा म्हैसूरमध्ये गौरव! म्हैसूर महानगरपालिका आयुक्तांसह प्रशासनाकडून कौतुक; धारावीतील ड्राय वेस्ट सेंटरला भेट देण्याची कोकाकोलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ग्वाहीयेळगाव-गोटेवाडी जलसंधारण तलावातील मोटारी बंद;पाणीसाठा मर्यादित; पुढील सहा ते सात महिने पाणी जपून वापरण्याचे आव्हानकराड बसस्थानकात पाण्याचा अपव्यय! एकीकडे पाणीटंचाईचे सावट, दुसरीकडे पाणी वाया जात असल्याचे चित्रउंडाळे परिसरात पाणीटंचाईचे सावट; जलसाठा जपण्याची गरज

कोल्हापूर नाका परिसरात रस्त्यावर पाणी; वाहनचालकांचा जीव मुठीत

कराड : कोल्हापूर नाका परिसरातील रस्त्याची पावसामुळे मोठी दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना अक्षरशः पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
फोटोमध्ये रस्त्यावर चिखल आणि पाण्याचे मोठे डबके दिसत असून, दुचाकीस्वार तसेच अवजड वाहनांची ये-जा सुरू आहे. रस्त्याच्या कडेला सुरू असलेले काम, मातीचे ढिगारे आणि पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.

Scroll to Top