ताज्या बातम्या

शिवसेना नगरसेवक साईनाथ दुर्गे यांच्या मातोश्री शांता दुर्गे यांचे निधन

मुंबई, दि. ६ सप्टेंबर : शिवसेनेचे नगरसेवक साईनाथ दुर्गे यांच्या मातोश्री श्रीमती शांता शिवाजी दुर्गे यांचे अल्पशा आजाराने आज, रविवार दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दुर्गे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.
शांता दुर्गे या प्रेमळ, मनमिळावू आणि कुटुंबवत्सल स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. त्यांचे निवासस्थान संकेत सोसायटी, भवानी शंकर रोड व आगाशे पथ कोपरा, गजानन महाराज मंदिराजवळ, दादर पश्चिम, मुंबई-२८ येथे आहे.
शांता दुर्गे यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि दुर्गे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Scroll to Top