ताज्या बातम्या

NHAIच्या कामावर प्रश्नचिन्ह; वारुंजी फाट्याजवळ गटाराचे निकृष्ट बांधकाम?

कराड : कराड–वारुंजी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या गटाराच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. फोटोमध्ये गटाराची काँक्रीट स्लॅब, बाजूचा भाग आणि मातीचे भरावाचे काम असमतोल व अपूर्ण अवस्थेत दिसून येत आहे.
गटाराच्या बांधकामात काँक्रीटचा दर्जा, स्लॅबची मजबुती तसेच बाजूच्या संरक्षक भिंतीच्या कामाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी बांधकामाच्या कडेला माती व खडीचा भराव असून, काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याची स्थिती खराब होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यात पाणी साचू नये आणि गटारातून पाण्याचा योग्य निचरा व्हावा, यासाठी अशा कामात दर्जेदार साहित्य आणि तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मात्र, वारुंजी फाट्याजवळील कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांनी बांधकामाचा दर्जा तपासावा, अशी मागणी होत आहे.
NHAI प्रशासनाने या कामाची पाहणी करून निकृष्ट काम असल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा वाहनचालक व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे

Scroll to Top