ताज्या बातम्या
विद्यार्थ्यांनी जिद्दीने ध्येय गाठावे; परिस्थिती बदलण्याची ताकद शिक्षणात – रामदास आठवले दक्षिण मुंबई पत्रकार संघातर्फे विद्यार्थ्यांना वही-पेन, पत्रकारांना रेनकोटचे वाटपस्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आणि लायन्स इंटरनॅशनल फूड ट्रकचे उद्घाटनबॉम्बे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यमंत्र्यांची कठोर भूमिकाखेलो इंडिया योजनेतून महाराष्ट्रातील क्रीडा प्रतिभेला नवी दिशा; ३६,४४१ कोटींच्या सुधारित योजनेत खेळाडू, पायाभूत सुविधा आणि क्रीडा विज्ञानावर भरकराड कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना उद्धट वागणुकीचा आरोप; चप्पल-बूट बाहेर काढण्याच्या सूचनेने संताप

विद्यार्थ्यांनी जिद्दीने ध्येय गाठावे; परिस्थिती बदलण्याची ताकद शिक्षणात – रामदास आठवले दक्षिण मुंबई पत्रकार संघातर्फे विद्यार्थ्यांना वही-पेन, पत्रकारांना रेनकोटचे वाटप

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते दक्षिण मुंबई पत्रकार संघाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. तसेच ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “आम्ही लहान असताना एका वहीत सर्व विषय लिहित होतो. अनेकदा ती एक वही मिळणेही कठीण होते. मात्र आज दक्षिण मुंबई पत्रकार संघाने विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या यशाला प्रोत्साहन देण्यासाठी वही-पेन देत त्यांना शाबासकी दिली आहे.”
“पत्रकारांना ऊन, वारा आणि पावसातही काम करावे लागते. त्यामुळे पत्रकारांना रेनकोट देण्याचा उपक्रमही कौतुकास्पद आहे. कार्यक्रम छोटा असला तरी माझ्यासाठी तो मोठा आहे. अशा कार्यक्रमांना मला आवर्जून उपस्थित राहायला आवडते,” असेही आठवले यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे. परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही; ती बदलत असते आणि ती बदलण्याची जिद्द आपण ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांनी भविष्यात डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार किंवा आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहावे आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन आठवले यांनी केले.
या कार्यक्रमाला मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दक्षिण मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष खलीफ सलीम, प्रियांका सिंग, रजनी गुप्ता, दिनेश मराठे, रवींद्र भोजने आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top