मुंबई (शांताराम गुडेकर ) :स्वातंत्र्यदिना निमित्त सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड,जिल्हा प्रशासन नांदेड आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2026 चे आयोजन कुसुम सभागृह,नांदेड येथे करण्यात आले. या महोत्सवाचे नेतृत्व डॉ. सान्वी जेठवानी, अध्यक्षा, सप्तरंग सेवाभावी संस्था तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा पालकमंत्री मा.अतुल सावे होते. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे,जिल्हाधिकारी राहुल कार्डिले,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण शिवानंद मिंगिरे ,महानगरपालिका आयुक्त महेश डोईफोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान मा. मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लायन्स इंटरनॅशनल फूड ट्रक चे उद्घाटन करण्यात आले. हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई सफ्रॉन यांच्या सहकार्याने हा प्रकल्प साऱ्यात आला या उपक्रमाची माहिती देताना सांगण्यात आले की, गरजू आणि वंचित घटकांना अन्न व मदत पोहोचवणे हा या फूड ट्रकचा मुख्य उद्देश आहे.
याप्रसंगी विशेष करून लायन्स क्लब ऑफ सॅफ्रन चे एक्सटेंशन चेअरमन लायन MJF विजय रायमाने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा 3234 H2 चे जिल्हा गव्हर्नर लायन राहुल औसेकर, व्हि.डी.जी.लायन योगेश कुमार जयस्वाल, पी.डी.जी.लायन जयेश ठक्कर, पी.डी.जी.लायन प्रवीण अग्रवाल आणि लायन्स क्वेस्ट चे लायन अशोक पांचाळ यांना लायन्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय समाजसेवेबद्दल सन्मानित करण्यात आले.हा संपूर्ण कार्यक्रम सेवा, समाजकल्याण आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेने पार पडला. सप्तरंग सेवाभावी संस्था आणि लायन्स इंटरनॅशनल यांची समाजसेवेसाठी असलेली सामायिक बांधिलकी यातून दिसून आली.




