ताज्या बातम्या

कवयित्री, लेखिका सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांना विशेष गौरव पुरस्कार

प्रतिनिधी : शिलवंत बहुुउद्देशिय विकास संस्था जाख द्वारा संचालित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोलीच्या संचालिका सन्माननीय उषा शिलवंत घोडेस्वार यांना मनाचे खेळ सायकॉलॉजी ३६५ विवर ऑफ दि मंथ विशेष गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले.
परिस फाऊंडेशन सांगली तर्फे आयोजित “मनाचे खेळ – सायकॉलॉजी 365” जुलै महिना या मानसशास्त्रीय मालिकेतील “विवर ऑफ दि मंथ” म्हणून सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांची निवड करण्यात आली. मानसशास्त्राविषयी ज्ञानार्जन, व्हिडिओ नियमित पाहणे, लाईक, कमेंट, शेअर करून सातत्यपूर्ण व सकारात्मक सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांना हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला आहे. सन्मानामध्ये “मनाचे खेळ – सायकॉलॉजी ३६५” पुस्तक (भेट स्वरूपात) प्रदान करण्यात आले. विवर ऑफ दि मंथ सन्मानपत्र तसेच परिस फाऊंडेशन कडून विशेष गौरव पुरस्कार देण्यात आला.
सौ. उषा शिलवंत घोडेस्वार यांच्या सकारात्मक सहभागामुळे, व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य जनजागृतीच्या कार्याला नवी प्रेरणा मिळत आहे. दररोज एक विचार… मनाला नवा दृष्टिकोन असा विचार ठेवून ही मानसशास्त्रीय मालिका सुरू आहे.
परिस फाऊंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉ अजित पाटील सर व त्यांची संपूर्ण टीम तसेच आयोजक समिती यांच्या नेतृत्वाखाली हा विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सामाजिक, साहित्यिक व मानसिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना हा विशेष गौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात येत असते सर्वांच्या परीक्षणेतून या सन्मानाची अतिशय सुरळीतपणे निवड करण्यात आली.

Scroll to Top