मुंबई : क्रांती दिनानिमित्त रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने मुंबईत मूक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मूक मिरवणूक नाना चौक येथील अग्निशमन केंद्राजवळून सुरू होऊन गवालिया टँक मैदानावरील हुतात्मा स्मारकापर्यंत काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने गिरणी कामगार सहभागी होणार असून स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
विधान परिषदेचे उपसभापती मा. सचिनभाऊ अहिर आणि गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मिरवणूक गवालिया टँक मैदानावर पोहोचल्यानंतर मा. सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर क्रांती दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास प्रसारमाध्यमांनी उपस्थित राहून प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन आयोजक काशिनाथ माटल यांनी केले आहे.



