मुंबई(शांताराम गुडेकर ) : दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, वीरा देसाई रोड येथे १ ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘ऑल ॲबिलिटी नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिप २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा सांगता व बक्षीस समारंभ शिवसेना सचिव व प्रवक्ते माजी आमदार श्री.किरण जी पावसकर व दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे जॉईंट प्रेसिडेंट तसेच स्पेशल ऑलिंपिक इंडिया, महाराष्ट्रचे जनरल सेक्रेटरी डॉ. भगवान तलवारे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.जनरल चॅम्पियनशिप गुजरात संघाने पटकावली त्याप्रसंगी शिवसेना राष्ट्रीय शिवस्वराज्य सेनेचे अध्यक्ष व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू सकपाळ व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रीकल्चर चे जॉईंट चेअरमन श्री.प्रशांत गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच महाराष्ट्र अध्यक्ष भाजपा उत्तर भारतीय मोर्चा चे श्री.संजय पांडये,राष्ट्रीय सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मा.श्री. संगीता कपूरे,राष्ट्रीय अध्यक्ष – महादेव नाद फाउंडेशन मा.श्री.गौरव शर्मा,सचिव महादेव नाद व इतर मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.




