ताज्या बातम्या
राजश्री शाहू महाराज मानधन योजनेतील विलंबाबाबत कलाकारांचा संताप; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनतहसील कार्यालयात तंबाखूचा विळखा; थुंकण्यासह तंबाखूचे ढीग, नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्याची गरजयशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ वितरण सोहळा १५ ऑगस्टला वाशीत आमदार चित्रा वाघ, विजय चौगुले, मनोज सानप यांच्यासह मान्यवरांची उपस्थितीअवघ्या १ वर्षे ११ महिन्यांच्या नित्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमी नोंद; जिंतीच्या कन्येची राष्ट्रीय पातळीवर चमकशिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील युगपुरुष हरपला

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ वितरण सोहळा १५ ऑगस्टला वाशीत आमदार चित्रा वाघ, विजय चौगुले, मनोज सानप यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

नवी मुंबई : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यशवंतराव चव्हाण फाउंडेशन यांच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ वितरण सोहळ्याचे आयोजन १५ ऑगस्ट २०२६ (स्वातंत्र्यदिन) रोजी सायंकाळी ५ वाजता नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन येथे करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली.
गेल्या आठ वर्षांपासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यंदाच्या सोहळ्यास आमदार चित्रा वाघ, नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, चंद्रकांत चाळके, नेत्रा शिर्के, कविता कचरे, अपर्णा पाटील, रंजना शिंत्रे, सचिन आचरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी युनिटी इंडस्ट्रीजचे उद्योजक रामदास शिंगारे यांच्या मातोश्री आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे यांना ‘विशेष आदर्श माता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय कला, साहित्य, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा, प्रशासन, उद्योग, महिला सक्षमीकरण, गड-किल्ले संवर्धन, नेमबाजी, कुस्ती, सौर ऊर्जा, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्राजक्ता महामुनी-पोतदार, प्राची देवकर, डॉ. पूजा सामंत, नम्रता पाटील, नमिता पाटील, निशिगंधा कापडणीस, विकास वाघमारे, प्रभाकर खैरनार, भरत ढेरे, किरण चेन्ने, अश्विनी शिबे, पै. राहुल पाटील, पीएसआय उज्वला गोळेसर, शर्मिला पडिये, रुपेश कोलते, दीपक कोकाटे, विलास डेरे, अनिकेत पोखरकर, आदित्य सावंत, सुरेश पवार, गणेश थोरात, नितीन भोसले, अर्चना सदरे, मेघा शिंपी, छाया चौधरी, नंदा डेरे, संध्या माने, मीना शेळके, सागर घोडके, पत्रकार बबलू पेशकर, माधवी सूर्यवंशी, रावसाहेब घोडेवार, संजय नायकवडी, बाळकृष्ण पाटील, श्रुती तुडमे तसेच राजे प्रतिष्ठान युवक संघटना, ढाणकेवाडी यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि मानाचा फेटा देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन प्रकाश बोत्रे, संजय आंबुळकर, अमोल भिंगारदेवे, सुशांत भिसे, रंजना एकावडे, विद्याराणी सकटे आणि रोहन येळवे यांनी केले असून, स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Scroll to Top