ताज्या बातम्या
राजश्री शाहू महाराज मानधन योजनेतील विलंबाबाबत कलाकारांचा संताप; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनतहसील कार्यालयात तंबाखूचा विळखा; थुंकण्यासह तंबाखूचे ढीग, नागरिकांना स्वच्छतेचे धडे देण्याची गरजयशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ वितरण सोहळा १५ ऑगस्टला वाशीत आमदार चित्रा वाघ, विजय चौगुले, मनोज सानप यांच्यासह मान्यवरांची उपस्थितीअवघ्या १ वर्षे ११ महिन्यांच्या नित्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमी नोंद; जिंतीच्या कन्येची राष्ट्रीय पातळीवर चमकशिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील युगपुरुष हरपला

अवघ्या १ वर्षे ११ महिन्यांच्या नित्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये विक्रमी नोंद; जिंतीच्या कन्येची राष्ट्रीय पातळीवर चमक

कराड, (अमोल पाटील ): कराड तालुक्यातील जिंती गावची कन्या व व्हीएसआय (VSI)ची विद्यार्थिनी कु. नित्या सुप्रिया सर्जेराव खोचरे हिने अवघ्या १ वर्षे ११ महिने वयात देशातील प्रतिष्ठित ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘IBR Achiever’ म्हणून विक्रमी नोंद करून जिंती गावासह कराड तालुका आणि सातारा जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. एवढ्या लहान वयात राष्ट्रीय स्तरावरील हा बहुमान मिळवणाऱ्या नित्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

नित्याने विज्ञान विषयातील १ ते ३० क्रमांकापर्यंतची सर्व मूलद्रव्ये अवघ्या ४६ सेकंदांत अचूक क्रमाने म्हणून दाखवत हा अनोखा विक्रम प्रस्थापित केला. तिची स्मरणशक्ती, आकलन क्षमता आणि आत्मविश्वास पाहून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिला ‘IBR Achiever’ म्हणून अधिकृत मान्यता दिली.

इतक्या कोवळ्या वयात मिळालेल्या या यशामागे तिचे आई-वडील, कुटुंबीय तसेच शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि मेहनत महत्त्वाची ठरली. नित्याच्या यशामुळे जिंती गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आजच्या स्पर्धात्मक युगात लहान वयातच असामान्य बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी नित्या इतर बालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही मोठी प्रेरणा निर्माण झाली असून योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.

भविष्यातही नित्या विविध शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रांत अशीच उल्लेखनीय कामगिरी करून जिंती गाव, कराड तालुका, सातारा जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करेल, असा विश्वास ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींनी व्यक्त केला आहे.

Scroll to Top