ताज्या बातम्या

साताऱ्यात १२० पैकी ८१ अयशस्वी कुटुंब नियोजनाच्या महिलांना २५ लाख ६५ हजार रुपयांचे वाटप…

सातारा(अजित जगताप) : गेली सात वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये कौटुंबिक नियोजनाची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने अनेक महिलांना अपत्य झालेले आहे. याबाबत विचार विनिमय करून प्रत्येकी ३० हजाराप्रमाणे ८१ महिलांना निधी वाटप करण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सुनिधीतून विधायक उपक्रम व बक्षीस राबवण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले व मान्यवरांनी दिले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांच्या दालनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. सन २०१८-१९ पासून १२० पैकी ८१ लोकांना हा निधी वाटप करण्यात आलेला आहे. सहा महिन्यापासून निधीची मागणी केल्यानंतर आता हा निधी आला असून उर्वरित ३९ महिलांनाही त्याचे वाटप होणार आहे. तसेच सातारा जिल्हा परिषदेने स्व निधीतून शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रवविच्छेदन करणाऱ्या कर्मचा-यांना प्रति शवविच्छेदन एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. शासनाकडील मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सातारा जिल्हयातील पोलिस मुख्यालय असलेल्या व महामार्गावर असलेल्या १८ प्राथमिक आरोग्य
केंद्रांचे ठिकाणी शवविच्छेदन गृह बांधणेत आलेली आहेत. शवविच्छेदन गृह उपलब्ध
असूनही वर्ग – ४ कर्मचारी उपलब्ध नसलेने शवविच्छेदन करणेसाठी मृत व्यक्तीस अनेक
वेळा जिल्हा किंवा तालुकास्तरावर स्थलांतरीत करावे लागते. बरेचदा शवविच्छेदनासाठी
प्रशिक्षीत कर्मचारी नसल्याने मृत व्यक्तीची हेळसांड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याअनुषंगाने जिल्हास्तरावरुन जिल्हा परिषद स्वनिधी मधून प्राआकेंद्रांचे ठिकाणी
असलेल्या शवविच्छेदन गृहातील एका शवविच्छेदनासाठी एक हजार रुपये सानुग्रह अनुदान
दिल्यास वर्ग – ४ कर्मचारी शवविच्छेदनासाठी तयार होतील. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण
देऊन शवविच्छेदन करणे सोईचे होईल. सदर योजनेची अंमलबजावणी दिनांक १५ ऑगस्ट
२०२६ पासून होणा-या शवविच्छेदनासाठी सुरु करणेत येईल.
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर एका महिन्यात १० किंवा त्यापेक्षा जास्त प्रसुती करणा-या संस्थांना व कर्मचा-यांना विशेष बक्षिस योजना जाहीर केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर प्रसुती सेवा देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन मिळाल्यास सुरक्षित प्रसुती दर वाढतील आणि मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी होण्यास मदत होईल. महिन्यात प्रति आरोग्य संस्था किमान १० किंवा त्यापेक्षा जास्त प्रसुती करणाऱ्या संस्थांना व कर्मचाऱ्यांना विशेष बक्षिस देण्यात येणार आहे.
शंभर किंवा त्यापेक्षा जास्त प्रसुती करणा-या प्रथम तीन सातारा जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य संस्थांना प्रत्येकी रु.१.५० लक्ष प्रमाणे – एकूण रु.४.५० लक्ष, ७५ ते १०० प्रसुती करणा-या प्रथम तीन आरोग्य केंद्रांनाही एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ७४ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये प्रसुती केल्यास संबंधीत गरोदर मातेस पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे यासाठी ७५ लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. गेल्या तीन महिन्यात ३८६ प्रसूती जिल्हयातील सर्व केंद्रात झालेली आहे.आरोग्य सेवांचा दर्जा वाढणेसाठी प्राआकेंद्र स्तरावरील आंतररुग्ण, बाहयरुग्ण संख्या व प्रसुतीची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रसुतीची संख्या वाढल्यास जनमानसात संस्थेची विश्वाहर्ता वाढण्यास निश्चित परिणाम होईल. त्यासाठी प्राआकेंद्र/उपकेंद्रांत प्रसुती झाल्यास संबंधीत गरोदर मातेस पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान त्यांचे बँक खातेवर जमा करणेत येईल. सदर योजनेची अंमलबजावणी दिनांक १५ ऑगस्ट २०२६ पासून होणाऱ्या या सर्व प्रसुतीसाठी सुरु करणेत येईल. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा जगताप, हनुमंत जगदाळे, सोनाली पोळ, जावळी पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, प्रसिद्धी समन्वयक संजय जाधव व मान्यवर उपस्थित होते.
——&————————————
फोटो- सातारा जिल्हा परिषदेमध्ये योजनेची माहिती देताना पदाधिकारी व मान्यवर

Scroll to Top