दहिवडी(अजित जगताप) :सातारा जिल्ह्यातील माण (दहिवडी) तहसील कार्यालयातील शासकीय पुरवठा शाखेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे. दुष्काळी माण तालुक्यात भ्रष्टाचाराचा सुकाळ सुरूच आहे. याबाबत आता जनतेनेच निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे.
दहिवडी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक पदावर कार्यरत असणारे
मेघराज बाळासाहेब जाधव (वय ३५ वर्ष, रा. वाकेश्वर रोड, वडूज, ता. खटाव जिल्हा सातारा
यांनी सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातील दर महा मंजूर होणारा कोटा मिळवून द्यावा यासाठी ३,५०० रुपये मागणी पूर्ण झाल्यानंतर
शिधा वाढवून मिळेल असे सांगितले. उद्या शासकीय कार्यालयात मागणी तसा पुरवठा करणे हे शक्य असते परंतु त्यासाठी लाच पुरवठा करणे. हा एक नियम झाला होता. याला कंटाळलेल्या पुरवठा शाखेतील व्यवहाराबद्दल शासनमान्य शिधावाटप दुकानदारांनीच चांगला धडा शिकवला आहे. थेट सातारा लाख लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार करून ही गोष्ट चव्हाट्यावर आणली आहे.
तक्रारदाराकडून पुरवठा निरीक्षक मेघराज जाधव यांनी तडजोडीअंती ३,५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पुरवठा शाखेत सापळा रचला आणि लाचेची रक्कम स्वीकारताना पुरवठा निरीक्षक जाधव यांना रंगेहाथ पकडले.
या कारवाईनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, दहिवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष श्रीमती शैला कोरडे, अधिकारी शिरीष सरदेशपांडे ,अर्जुन भोसले व नितीन गोगावले, निलेश राजपुरे, गणेश ताटे, अजित कर्णे यांनी केली आहे. दुष्काळाने सामान्य जनता होरपळत असताना मानवता भावनेतून त्यांना मदत करण्याऐवजी लाच स्वीकारली जाते. शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त बोनस किंवा आगाऊ रक्कम मिळते. तरीसुद्धा लाच मागितली जाते हेच दुर्दैव आहे. सध्या जेवढा भ्रष्ट अधिकारी तेवढ्या प्रमाणात काही साहित्य खरेदी करावेत अशी सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात जबरदस्ती केली जाते. यावरही आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लक्ष ठेवावे. अशी मागणी होऊ लागलेली आहे. याबाबत कुणीही लेखी तक्रार करत नाहीत. त्यामुळे आता काहींचे चांगलेच फावले आहे. याचा आता फटका प्रामाणिक होत निस्वार्थी प्रदेश काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही बसत असल्याची चर्चा सातारा जिल्हा परिषद मध्ये सुरू झालेली आहे.





