सातारा(अजित जगताप) : खटाव तालुक्यातील विसापूर या ठिकाणी मातंग समाजातील राजू वायदंडे यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण समाज चिंताग्रस्त झाला आहे. अशा वेळेला या घटने संदर्भात रिपब्लिकन पक्षाचे मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री अण्णा वायदंडे व सामाजिक कार्यकर्ते श्री सत्यवान कमाने आणि कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेतली. त्यांना बदनामी केली जाते ही बदनामी चळवळीतील सर्व कार्यकर्ते कदापी सहन करणार नाही असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( मातंग आघाडी) प्रदेश सचिव श्री नितीन तुपे यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील फुले- शाहू- आंबेडकर- साठे यांच्या विचारांच्या चळवळीत काम करणाऱ्या मातंग समाजाच्या भावना तीव्र झाल्या असताना कुठलीही गंभीर घटना घडू नये. यासाठी कायद्याच्या चौकटीत काही निर्णय घेतले. असे असताना ज्याला एका राजकीय पक्षाच्या नेत्यांबद्दल कावीळ झाली आहे. दुसऱ्याची बदनामी करण्याच्या प्रकरणात पोलीस कोठडी जावं लागले. अशा तुषार खरात नावाच्या इसमाने या घटनेच्या आधार घेऊन रिपब्लिकन पक्ष व पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे .या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करून सदर बदनामी कदापि सहन करणार नाही. या गोष्टीबाबत सातारा जिल्ह्यातील विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते व काही पत्रकारांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली असता श्री तुषार खरात नावाचे इसम हे लय भारी या माध्यमातून सर्व बहुजन समाजातील चळवळीत काम करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांना तसेच पत्रकारांना बदनाम करत आहेत. त्यांनी पराचा कावळा करून आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री अण्णा वायदंडे यांच्या अनुभवाचा व सामाजिक कार्याचा दखल न घेता आपल्या सर्वात कमी सबस्क्राईब असलेल्या चॅनल द्वारे बालबुद्धीचे वातावरण निर्माण केले आहे. खरं म्हणजे श्री अण्णा वायदंडे यांचा या चॅनलद्वारे उल्लेख झाल्यामुळे लय भारीचा टी.आर.पी.वाढलेला आहे. पण त्यांची प्रतिमा खालावत गेलेली आहे. याचे त्यांनी भान ठेवावे.
सर्व बहुजन समाजातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. श्री तुषार खरात या माथेफिरूच्या वागणुकीमुळे त्यांच्यावरती चिडून असलेल्या इतर समाजातील काहीजण बेदम मारहाण करण्याची शक्यता आहे. यासाठी आम्हीच आपल्याला निवेदन घेऊन त्यांना समोर देण्याची विनंती करत आहे. सातारा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सदर व्यक्ती करत आहे. ही गंभीर बाब आहे. मागासवर्गीय एका व्यक्तीने त्यांच्यावर यापूर्वी वडूज पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी दाखल केल्यामुळे मातंग समाजाबद्दल त्यांना कमालीची चीड व संताप आहे. या संतापापोटीस श्री अण्णा वायदंडे यांच्यासारख्या अनुभवी व निस्वार्थीपणाने सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीवर चिखल फेक केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रावर आधारित असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची ही त्यांनी बदनामी केली आहे. सदर व्यक्ती बहुजन समाजातील असल्यामुळे त्यांच्याच समाजातील चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी दिवसभर फोन व संपर्क ठेवून कृपया आमच्या जातीचा उल्लेख न करता व्यक्तिगतरीत्या त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा लागू करावा. अशी त्यांनी होऊन मागणी केलेली आहे. याबाबत श्री तुषार खरात यांनी चुकीची व दिशाभूल करणारी जी समाज माध्यमावर पोस्ट टाकले ती त्वरित डिलीट करून प्रायचित्त घ्यावे अन्यथा त्यांची अनुसूचित जमातीच्या कायद्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास मूक संमती आहे. असं गृहीत धरून त्यांच्यावर त्वरित संपूर्ण जिल्ह्यातून ॲट्रॉसिटी ॲक्ट चा गुन्हा दाखल केला जाईल. असा इशारा या निमित्त देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये गेले 40-45 वर्षांमध्ये मागासवर्गीयांवर झालेल्या अन्यायाबाबत तातडीने श्री अण्णा वायदंडे व त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी केलेल्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे. त्यामुळे समाजाच्या संतप्त भावना आवरण्यासाठी पोलीस दलाने तातडीने श्री तुषार खरात यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून त्वरित त्यांना अटक करावी. अन्यथा या प्रकरणाबाबत सातारा जिल्ह्यात पोलीस दलाच्या विरोधात मोर्चाचे नियोजन झालेले आहे. तत्पूर्वी तातडीने पोलीस दलाने मागासवर्गीयांच्या संतप्त भावना शांत करण्यासाठी त्वरित ॲट्रॉसिटी चा गुन्हा श्री तुषार खरात यांच्यावर दाखल करून त्यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्यांवरही ताशेरे ओढलेले आहेत. एकूण सदरची व्यक्ती ही मागासवर्गीय विरोधात सातत्याने समाज माध्यमावर बदनामी करत आहे. या व्यक्तीला मनोरुग्णासारखे वागण्याची सवय आहे. आम्ही समाजाच्या वतीने ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करत असताना या पाठीमागे कोणताही राजकीय पक्षाचा पदाधिकारी किंवा नेता नाही याची चांगली जाणीव श्री तुषार खरातांना असून सुद्धा ते या गोष्टीला वळण देण्यासाठी वापर करतील. अशी शंका आहे. सातारा जिल्ह्यात जेवढी पोलीस ठाणे व उपकेंद्र आहेत. प्रत्येक ठिकाणी श्री तुषार खरात यांच्या विरोधात कार्यकर्ते ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करतील. त्याची नोंद करून घ्यावी. ही या माध्यमातून विनंती करत आहे. यावेळी श्री नितीन तुपे यांच्यासोबत विजय पाटील, रघुनाथ बाबर, प्रवीण बोभाटे, पोपट उमाप, विजय खरात, दिलीप फरांदे, संदीप गोरे, राम दुबळे, सलमान शेख, सलीम बागवान, ईश्वर मोरे, प्रदीप जगताप , सोहेल शेख, राजू तावडे यांच्यासह विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही श्री अण्णा वायदंडे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.-
———————–
फोटो- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश सचिव नितीन तुपे
—————
प्रति/ माननीय संपादक,
दैनिक—————-, सातारा




