सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्क इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दोन पत्रकारांच्या विरोधात वेगळ्या पद्धतीने आंदोलन गाजवणारे सामाजिक कार्यकर्त्यांनी सलग चार दिवस घंटानाद आंदोलन केले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. पत्रकार चुकीच्या गोष्टीबद्दल प्रशासनाला धारेवर धरतो. तर साताऱ्यात चक्क पत्रकाराविरोधातच कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे मिडिया मधील अनेकांना त्याबाबत मौन धारण करण्यामध्ये धन्यता मानली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा तालुक्यातील आटळी येथील जमीन गट नंबर ३४७ क्षेत्र ०.३९.५० मध्ये शेतीची जागा सपाटीकरण करण्यास परवानगी बाबत ओमकार राजेंद्र कदम यांनी अर्ज दिला होता. या अर्जाची मंडलाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी आटळी यांनी सदर जागेचा पंचनामा करून सदरची क्षेत्र हे चढउताराचे असून शेती करण्याकरता सपाटी करण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत हरकत नसल्याचा अभिप्राय दिला होता. सदर ठिकाणी निघणारे गौण खनिजाचे कुठेही वाहतूक अगर विक्री करणार नाही. असा जबाब लिहून घेतला होता. केवळ शेती साठी सपाटीकरण करता येईल. लगतच्या गटात उत्खनन करता येणार नाही. वाहतूक करू नये. इतर वापरासाठी शासकीय परवानगी व फी भरणे बंधनकारक तसेच काही तक्रार तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे नमूद करून सात फेब्रुवारी २०२६ रोजी महसूल व वनविभाग तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय सातारा यांनी पत्र दिले आहे. त्याचबरोबर दिनांक १८/८/२०२६ रोजी आंदोलक संदीप वामन जाधव राहणार तांदुळवाडी तालुका कोरेगाव यांनी या परवानगी बाबत दिनांक २० जुलै २०२६ रोजी तक्रार अर्ज केला होता . त्याबाबत प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नसल्याने त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या अर्जाबाबत आंदोलन केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सातारा जिल्ह्यात पत्रकारितेच्या माध्यमातून सध्या वाद विवाद त्यातून एकमेकांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून गेली महिनाभर आरोप करण्याची मालिका सुरू झालेली आहे. त्याचाच भाग म्हणून गौण खनिज बाबत तक्रार झाल्याचे व कायदा व सुव्यवस्था पायदळी तुडवल्याची वृत्त प्रसिद्ध करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेले आहे. सातारा तालुक्यातील अटाळी येथील गट नंबर ३४७ मध्ये अनधिकृत विना परवाना उत्खनन झाल्याचा आरोप करून महसूल व वन विभागाने लेखी म्हणणे देण्यात आलेले आहे. या प्रकरणी पत्रकार व आंदोलक यांच्या मधील समज- गैरसमज मिटवून सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी सातारा जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेची आहे . असे असताना आता संबंधित पत्रकार व आंदोलक कार्यकर्ते या दोन्ही बाजूकडून या प्रकरणात खतपाणी घालण्यासाठी दोन्ही बाजूचे समर्थक प्रयत्न करीत आहेत. अशी गोपनीय माहिती मिळाली आहे. दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करून जे कोणी सत्य बाजू व वस्तुनिष्ठ पुरावा सादर करतील. त्यांच्या सांगण्यानुसार लोकशाही मार्गाने सखोल चौकशी करावी. अशी ही मागणी या प्रकरणापासून अलिप्त असलेल्या सामाजिक कार्यकर्ते व जाणकार आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणाऱ्या बहुतांश पत्रकारांनी खाजगीत केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मीडियाच्या संस्थेचा उल्लेख टाळून आंदोलन करावे. अशी सूचना मिडिया संस्थेच्या जबाबदार वरिष्ठ पत्रकारांना केली असल्याची माहिती आंदोलक श्री. संदीप वामन जाधव (गुणरत्न मावळा सामाजिक कार्यकर्ते) यांनी दिली आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लहान मुलांच्या खेळण्यातील छोटा जी.सी.बी. व छोटा डंपर घेऊन हे आंदोलन होत असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गौण खनिज प्रकरणी समजूतदार पद्धतीने एकमेकांशी संवाद साधून हा प्रश्न मिटवावा. यासाठी सध्या तरी कुणीही प्रयत्न करत नाही. त्यामुळेच साप समजून भुई धोपटण्याचा प्रयत्न होऊ नये. असे जाणकारांनी सांगितले. दरम्यान, घंटानाद आंदोलनाने प्रदूषण होत असेल तरी इतर घंटाबाबत निर्णय घेण्यात यंत्रणेने लक्ष द्यावे. अशी ही यानिमित्त मागणी पुढे आली आहे. तसेच पक्षपातीपणा कोणीही खपवून घेणार नाही. याची नोंद घ्यावी. हे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे. ————————
फोटो – सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खेळण्यातील जेसीबी व डंपर घेऊन आंदोलन करणारे आंदोलन संदीप जाधव




