सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. त्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष श्री. राजू भैया भोसले, शिक्षण, अर्थ व क्रीडा समितीच्या सभापती सौ. तेजस्विनी कदम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ ऋतुजा शिंदे,कृषी,पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती सौ लता कर्णे,
जि. प. सदस्य श्री दिलीप बाबर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. धनंजय चोपडे, शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती शबनम मुजावर यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
इयत्ता पाचवीतील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी
स्वरा आशुतोष गार्डी, जि.प. शाळा ओझर्डे – राज्यस्तरावर प्रथम क्रमांक,स्वराज श्रीनिवास कुंभार, जि.प. शाळा ओझर्डे – राज्यस्तरावर चौथा क्रमांक,स्वरूप अरुण तरटे, ज्ञानसंवर्धिनी विद्यालय, शिरवळ – सहावा क्रमांक,मनोमय मिलिंद साळुंखे, केंद्रशाळा तारळे (मुले), ता. पाटण – सातवा क्रमांक,आरुषी मनोज पाडवी, जि.प. शाळा पिंप्रद, ता. फलटण – सातवा क्रमांक,स्वानंदी पुंडलिक मस्कर, शेतकरी हायस्कूल, तारगाव (ता. कोरेगाव) – सातवा क्रमांक,देवांश विशाल शेटे, जि.प. शाळा आसनी, ता. जावली – नववा क्रमांक,भाग्यश्री विजयकुमार निंबाळकर, सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल, साखरवाडी (ता. फलटण) – नववा क्रमांक,अर्णव नितीन फरांदे, जि.प. शाळा विद्यानगर, फलटण – नववा क्रमांक
,प्रणिती अमोल पवार, श्री जानाई हायस्कूल, राजाळे (ता. फलटण) – नववा क्रमांक
,शिवांश सूरज शिंदे, जि.प. शाळा सोनगाव (स. निंब) – नववा क्रमांक
इयत्ता आठवीतील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी,आर्या गणेश माईनकर, नवमहाराष्ट्र विद्यामंदिर, बिदाल (ता. माण) – तिसरा क्रमांक,शैलेश अण्णाराव सुरवसे, शासकीय विद्यानिकेतन, पुसेगाव (ता. खटाव) – पाचवा क्रमांक,सृष्टी दीपक पाटील, अंबामाता विद्यामंदिर, वाठार किरोली (ता. कोरेगाव) – पाचवा क्रमांक,विनया नवनाथ जाधव, श्रीमती रुक्मिणी पांडुरंग कदम विद्यालय, उंब्रज – सहावा क्रमांक,अनुष्का बजरंग थोरात, श्रीमती रुक्मिणी पांडुरंग कदम विद्यालय, उंब्रज – सहावा क्रमांक,स्वरांजली अनिल माने, कोटेश्वर विद्यालय, तांदुळवाडी (ता. कोरेगाव) – सहावा क्रमांक,शौर्य ईश्वर शेळके, ज्ञानसंवर्धिनी प्राथमिक विद्यालय, शिरवळ (ता. खंडाळा) – दहावा क्रमांक,ईश्वरी संदीप माने, जयराम स्वामी विद्यामंदिर, खटाव – दहावा क्रमांक
,नम्रता समाधान चौधरी, ज्ञानसंवर्धिनी प्राथमिक विद्यालय, शिरवळ – बारावा क्रमांक
,संस्कृती सचिन अभंग, न्यू इंग्लिश स्कूल, होमगाव (ता. जावली) – चौदावा क्रमांक
,सिद्धी राजेंद्र ढोक, नवमहाराष्ट्र विद्यामंदिर, बिदाल (ता. माण) – चौदावा क्रमांक यांच गौरव करण्यात आला
.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून सातत्यपूर्ण परिश्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि जिद्दीच्या बळावर विद्यार्थ्यांनी सातारा जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केल्याचे सांगितले. भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट यश संपादन करून जिल्ह्याचा आणि राज्याचा गौरव वाढवावा, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणखी एकदा ठसा राज्यस्तरावर उमटल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
——————————————-
फोटो– सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा (छाया- अजित जगताप, सातारा)




