नवी मुंबई : नवी मुंबई सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते, एल आय सी ऑफ इंडिया चे अनेक पुरस्कार विजेते व गार्डन ग्रुप ७ :५० समूहाचे खजिनदार श्री. रणवीर धनराज पाटील यांनी २ जुलै २०२६ रोजी सानपाडा विभागातील नागरिकांना जवळजळ १२५ छत्री वाटप केल्या. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, वीमा योजना ( एल. आय. सी.) कंपनीमार्फत आपल्या सहकाऱ्यांना नेहमी प्रामाणिकपणे सेवा देणारे, सर्वांना संकटकाळी मदत करणारे, अनेक बक्षिसे घेऊन प्रगतीचा आलेख उंचावणारे सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील यांना नगरसेवक सोमनाथ वास्कर, नगरसेवक भाऊ भापकर, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख अजय पवार, शाखाप्रमुख दत्तात्रय कुरळे, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हा प्रमुख अजित सावंत, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सुर्याराव, राजु सैद, नरेश देशमुख. पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, व्यावसायिक अशोक गायकवाड व शंकरशेठ चिकने, गार्डन ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तावडे, गणपत वाफारे, ज्येष्ठ नागरिक मारुती शिंदे इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. गार्डन ग्रुपच्या अनेक सदस्यांनी लगेच एल. आय. सी. ची नवीन पॉलिसी घेण्याचे आश्वासन दिले. गार्डन ग्रुपची एकजूट दाखवून दिली त्याबद्दल रणवीर पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.




