ताज्या बातम्या

उपनगराचा राजा गणेशोत्सवाची दिमाखदार सुरुवात; गणेशमूर्तीची पाद्यपूजा उत्साहात संपन्न

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली (पूर्व) येथील ‘उपनगराचा राजा’ या भव्य गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची पाद्यपूजा मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
या विशेष सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेतील गटनेते Pravin Darekar यांनी सपत्नीक उपस्थित राहून गणेशमूर्तीची पाद्यपूजा केली. तसेच नगरसेविका ॲड. सौ. सीमा शिंदे व श्री. किरण शिंदे या दांपत्यांनीही विधीवत पूजेत सहभाग घेतला. यावेळी परिसरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाच्या प्रारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी साकारण्यात येणारी भव्य गणेशमूर्ती मुंबईतील प्रख्यात मूर्तीकार Vijay Khatu यांच्या कन्या रेश्मा विजय खातू यांच्या हस्ते साकारली जाणार असून, या मूर्तीबाबत भाविकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.
पाद्यपूजेच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जतन आणि जनसंपर्क वृद्धिंगत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

(छायाचित्र : योगेश पाडलोसकर)

Scroll to Top