ताज्या बातम्या

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रतिज्ञा  

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटरमध्ये दहशतवाद हिंसाचार विरोधी दिनानिमित्त नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्यासमवेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक श्री. राजेंद्र गाडेकर, सहा. आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण, प्रशासकीय अधिकारी श्री.संजीव पवार व श्री.दत्तात्रेय काळे आणि उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी सामुहिक प्रतिज्ञा ग्रहण केली. यावेळी माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याव्दारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करीत आहोत अशी प्रतिज्ञा घेत महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाने आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जीवित आणि मूल्य धोक्यात आणणाया विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करू असा प्रतिज्ञेचा मजकूर महापौर महोदयांसमवेत सामुहिकरित्या म्हटला

Scroll to Top