मुंबई : बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले विक्रमादित्य डॉ. हेमराजभाई शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवनीत गुजराती भवन येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत कच्छ शक्ति चे ४७ व्या वर्षीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण १६ जुलै २०२६ रोजी दादर येथील योगी सभागृहात होणाऱ्या एका शानदार सोहळ्यात करण्यात येणार असल्याचे डॉ हेमराज शाह यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले. डॉ हेमराज शाह यांच्या समवेत कन्हैयालाल जोशी, डॉ. नागजी रीटा, चिमन मोता, ॲड. पीयुष एम शाह, वेलजी अखेराज बोरीचा, मिलन सोनी (भूज), उदय हेमराज शाह या बैठकीला उपस्थित होते. प. पू. जयपडमा गुणाजी महासतीजी (अचलगच्छ) यांना २०२६ चा कच्छ रत्न ॲवॉर्ड तर जयंतीलाल केशवजी छाडवा (चेंबूर) यांना समाजरत्न ॲवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. धर्मप्रेमी ॲवॉर्ड नरेंद्रभाई आर. नंदु यांना तर समाजसेवा ॲवॉर्ड महेंद्र छेडा (वापी) यांना जाहीर करण्यात आला आहे. भूज येथील वेलजीभाई मेहता यांनाही समाजसेवा ॲवॉर्ड देण्यात येणार आहे. अंजार येथील अजय सोनी यांना साहित्य रत्न ॲवॉर्ड जाहीर करण्यात आला असून संशोधन ॲवॉर्ड भीमासर वागड चे महादेव बारड यांना देण्यात येणार आहे. मुलुंड येथील समीरा रांभिया यांना नारीरत्न ॲवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. हाच नारीरत्न पुरस्कार कु. दिशा देढिया यांनाही देण्यात येऊन सन्मानित करण्यात येणार आहे. टी व्ही स्टार ॲवॉर्ड चौरंगी फिल्मचे नील भट्ट यांना देण्यात येणार आहे. बाल कलाकार ॲवॉर्ड बोरीवलीच्या मितेन परीन गाला (हेमुदादा) यांना देण्यात येणार आहे. लीगल प्रोफेशन ॲवॉर्ड माझगांव येथील कांतिलाल संघोई यांना तर फोटोग्राफी ॲवॉर्ड जन्मभूमी चे विरल कन्हैयालाल जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. मकाबोचे संपादक उमेश एम त्रिवेदी आणि भूज मधील वावड आणि कच्छ दर्शन चे संपादक दर्शनकुमार राम ठक्कर यांना पत्रकार ॲवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. नृत्यरत्न ॲवॉर्ड सामखियारीच्या भगिनी खुशी गडा आणि जान्हवी गडा यांना तसेच पार्श्वगायक ॲवॉर्ड राजकोट येथील निधी धोळकिया यांना, शिक्षण ॲवॉर्ड दिशांत अमृतलाल निसर (आय ए एस) यांना, व्यापार उद्योग ॲवॉर्ड गंधीधामचे सुवर्णकार भूषण आर. सोनी आणि जस्ट इन टाइमचे राजूभाई छेडा यांना देण्यात येणार आहे. १६ जुलै रोजी होणाऱ्या या समारोहात जैन मॅरेज मिशनच्या आठ पंथाच्या प्रमुखांनाही गौरवान्वित करण्यात येणार आहे. आषाढी बीज : कच्छी नववर्ष १६ जुलै २०२६ रोजी दादर येथील योगी सभागृहात कच्छ शक्तिच्या विद्यमाने निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा प्रारंभ टीना छेडा यांच्या संगीत संयोजनाखाली सुमधूर गीतांनी होणार असून कच्छ शक्ति राष्ट्रीय पुरस्कार प्रदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. गेल्या ४७ वर्षांपासून अविरतपणे मुंबई येथे कच्छी नववर्ष साजरे करण्यात येते. या समारोहाचे सूत्रसंचालन रीटा हरिया करतील, अशी माहिती डॉ हेमराज शाह यांनी दिली.*




