सातारा(अजित जगताप) : वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या ऐतिहासिक पुस्तकाचे सामुदायिक वाचन केले यामुळे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची युवा पिढीला ओळख झाली. तात्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी बी सावंत यांचे पत्र असलेल्या या पुस्तकांमध्ये लेखक गोविंद पानसरे यांनी निवेदन केलेले आहे ११ एप्रिल १९८८ रोजी या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. पूर्वी इतरांनी लिहून ठेवले त्याची सारी उसनेवारी आहे तपशील व संदर्भ अर्थातच इतरांचे मांडे फक्त गोविंद पानसरे यांनी केले आहे असे लेखकाने निवेदनात नमूद केले आहे. ४३ बकर ,शिवकालीन इतिहास पत्रे, आज्ञापत्र, पारसनीस मराठे सरदार, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, शककर्ता शिवाजी, हिंदू मुस्लिम तणाव व जमात वादाचा धोका महात्मा फुले यांचे समग्र वांग्मय आधी पुस्तकांचा संदर्भ या पुस्तकाला लाभलेला आहे. सातारा शहरातील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? त्या पुस्तकाचे सामुदायिक रित्या वाचन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे सातारा युवक जिल्हाध्यक्ष अमोल गंगावणे, महासचिव सायली भोसले, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा अध्यक्ष दयानंद माने, फिरोज पठाण, आनंदा साठे, प्रदीप वायदंडे, दीपक पवार, प्रवीण साळवे, शहराध्यक्ष तेजस ओव्हाळ, विशाल भिसे, राजेंद्र ओव्हाळ, संदीप कांबळे, दीपक चव्हाण, मिलिंद कांबळे, रफिक शेख, फारुक शेख, व शिवप्रेमी सातारकर यांनी मोठी गर्दी केली होती. सातारा येथील विद्रोही साहित्य संमेलनामध्ये या पुस्तकाची विक्रमी खरेदी करून””” आम्ही सारे गोविंद पानसरे ”””हेच सातारकरांनी दाखवून दिले. सातारा हा क्रांतिकारकाचा जिल्हा असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिगामी शक्ती काम करत असली तरी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते त्याच ताकदीने सत्य मांडण्यासाठी धडपड करत असतात. दिवसेंदिवस वैचारिक भूमिका घेऊन सामाजिक बांधिलकी मानत आहे. सातारकर नागरिकांनी कधीही खोटे इतिहासाला जवळ केले नाही किंवा भावनिकरित्या लोकांना दिशाभूल करण्याचे काम स्वीकारले नाही. त्याचेही या निमित्त कौतुक करण्यात आले. यावेळी अनेकांनी आई हा शब्द आपण एकेरी वापरतो कारण ते आत्मनिता व आपुलकी दाखवणारे आहे तशाच प्रकारे शिवाजी कोण होता? वाक्य आत्महत्या व आपुलकी दाखवणारे आहे. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडी सातारा युवक जिल्हाध्यक्ष अमोल गंगावणे यांनी समर्थन केले आहे. –
—————————-
फोटो- सातारा शहरात शिवाजी कोण होता याचे सामुदायिक वाचन करताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते (छाया– अजित जगताप, सातारा)




