सातारा – अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील कलेच्या दालनात आपल्या आवाजाने संगीतमय मनोरंजन केले. त्या लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या स्मृत्यर्थ सातारा जिल्ह्यातील सौ मंगला लहू जावळे व कोल्हापुर येथील गायन पेटी तबलावादक उस्ताद हरी किसन डावाळे यांना कलेतील योगदानाबद्दल लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर तमाशा कलावंत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याच नावाने महाराष्ट्रातील तमाशा कलावंतांना अखिल महाराष्ट्र लोकनाट्य संस्कृती कलाकार संघटनेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत अशी माहिती या संघटनेचे अध्यक्ष नारायण जावलीकर यांनी दिली आहे. जावळी तालुक्यातील सौ मंगला लहू जावळे यांनी ग्रामीण भागामध्ये तमाशा कलेला प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली होती. बरोबर तबलावादक उस्ताद हरीकिसन डावळे यांनीही तबलावादन करून सर्व तमाशा कलावंतांना मोलाची साथ दिली होती. त्यांच्या कलेचा गौरव म्हणून या दोन्ही कलाकारांना सन्मानचिन्ह , शाल , बुके व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागामध्ये मनोरंजनाचे कोणतेही साधन नव्हते त्यावेळेला पायाला घुंगरू बांधून ग्रामीण भागातील वार्षिक यात्रेत झाडाखाली मनोरंजनाचे अनेक पैलू रसिकांचे मनोरंजन करत होते. गावोगावी भटकंती करताना अनेक वाईट चांगले अनुभव आलेले आहेत. आज मनोरंजनाचे इंटरनेटचे दालन उघडले असले तरी एका पिढीने तमाशा पाहून या कलेला मानसन्मान दिला होता. आज तमाशा मध्ये ऑर्केस्ट्रा अधिक दिसू लागलेला आहे. यावेळी तमाशा कलावंतांचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे. या शब्दात अनेक कलावंतांनी भावना व्यक्त केल्या.
सौ मंगला जावळे व हरी डावाळे या कलावंतांनी पारंपारिक तमाशा क्षेत्रात तमाशा कलावंत म्हणून भरीव स्वरूपाचे काम करून या कलेला योगदान दिले आहे. तमाशा कला अंत:करणापासून जोपासली आहे. त्यांचे या क्षेत्रात केलेले काम लक्षात घेऊन त्यांना यावर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार लवकरच दोन्ही कलावंतांच्या घरी जाऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष नारायण जावळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
——————————–&&———
फोटो- लावणी साम्राज्ञी मुराबाई वाईकर पुरस्कार प्राप्त तमाशा कलावंत जावळे व श्री डावळे (छाया- निनाद जगताप, सातारा)




