ताज्या बातम्या

शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू,नीलम गोऱ्हे यांचे उमेदवारी अर्ज दाखल; प्रमुख नेत्यांची उपस्थिती

मुंबई : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महत्त्वाची हालचाल करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या माजी उपसभापती आणि शिवसेना महिला नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे तसेच प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज शिवसेनेच्या वतीने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना सरचिटणीस व माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार मुरजी पटेल यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाच्या नेत्यांनी एकजूट दाखवत आगामी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसेच, राज्यातील राजकीय वातावरणात या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले असून शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

Scroll to Top