ताज्या बातम्या

जी-उत्तर विभागात कर्करोग प्रतिबंध कार्यशाळा संपन्न

मुंबई : जी-उत्तर विभागात टाटा मेमोरियल रुग्णालय च्या वतीने कर्करोग प्रतिबंध कार्यशाळा उत्साहात पार पडली. दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या कार्यशाळेत कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यशाळेत कर्करोग टाळण्यासाठी आवश्यक काळजी, प्रारंभीची लक्षणे, तसेच आजार झाल्यास घाबरून न जाता योग्य वेळी उपचार घेण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. टाटा मेमोरियल रुग्णालयातील डॉ. अंजली पांडे तसेच सहाय्यक समाज विकास अधिकाऱ्यांनी उपचार पद्धती व शासनाच्या विविध योजनांद्वारे उपलब्ध होणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती दिली.
कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापन विभागातील समुपदेशक, पर्यवेक्षक आणि मुकादम यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, अशा प्रकारच्या कार्यशाळा मे महिन्यात घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व चौक्यांमध्ये आयोजित करून कामगारांमध्ये कर्करोगाविषयी व्यापक जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाबद्दल विभागातील अधिकाऱ्यांनी टाटा मेमोरियल रुग्णालय चे आभार मानले.

Scroll to Top