कोल्हापूर(अजित जगताप) : श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने मंगळवार दि. ३१ मार्च ते शनिवार ४ एप्रिल २०२६ या कालावधीत सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या दुर्मिळ कारागीर महाकुंभात पारंपारिक, हस्तकला, कला यातील स्थानिक कलाकार आपल्या कलेचे कौशल्य लोकांसमोर सादर करतील. अलीकडच्या काळात लोकांच्या पसंतीनुसार कला आणि हस्तकलामधील विविध प्रकार उदयास आलेले आहेत. अश्या दुर्मिळ व मौल्यवान भारत देशातील कला आणि हस्तकला उपलब्ध होणार आहे. आदिवासी भागातील कलाकारांचे कसब आणि कौशल्य यातून दुर्मिळ कलात्मक व आकर्षक अशा वस्तू तयार होत आहेत. तुला मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत मागणी वाढलेली आहे. जुने ते सोने समजून अनेक ग्राहक अशा वस्तू आपल्या शोकेसमध्ये ठेवत आहेत . अशा कलाकृतीचे दर्शन होण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांना व कारागिरांना निमंत्रित केलेले आहे. १७ राज्यांमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त कारागीर व कलाकार ‘सिध्दगिरी कारागीर महाकुंभा’मध्ये सामील पवन कलेचे दर्शन घडवणार आहेत. अशा वस्तूंची विक्री सुद्धा उपलब्ध केली आहे.
टेराकोटा, मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वुड कला, बांबू काम, लेदर वर्क विविध राज्यातील एंब्रॉयडरी पॅच वर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला बाहुलींच्या प्रतीकात्मक ऐतिहासिक मुर्ती, स्टोन वर्क, कच्छ मधील राबरी कला, ग्लास एस वर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्न पासून वस्तू. मधुवेनी पेंटिंग, लाकेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी जरदोशी साड्या इ. हस्तकलेचे विविध प्रकार विक्रीसाठी व पाहण्यास मिळणार आहेत. त्यावेळी विवेक सिद्ध म्हणाले, “ तंत्र महाविद्यालय, महाविद्यालय, पॉलीटेक्नीक, अभियांत्रिकी महाविद्यालय, आय.टी.आय. यात शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना या कारागीर कलेची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी महाकुंभासाठी पाचारण केले आहे. त्यांच्याकडून दुर्मिळ व अत्याधुनिक अशा दोन्ही पद्धतीचा उगम होऊन कलेची निर्मिती व्हावी ही अपेक्षा आहे. यासाठी एकत्वं इन्फ्रा कंपनीचा सहभाग आहे.
या पत्रकार परिषदेसाठी सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, मुख्यकार्यकारी अधिकारी जी.पी.वढड, विक्रम पाटील, प्रल्हाद जाधव, विवेक सिद्ध, दयानंद डोंगरे, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील, दिवाकर पाटील, पुनीत मुचंडी उपस्थित होते.
——-+——- ———— ———– ———-
फोटो– पूज्य श्री काडसिद्धेश्वर महाराज व मान्यवर हे कारागीर महा कुंभ मेळाव्याची माहिती देताना (छाया– अजित जगताप सातारा)




