ताज्या बातम्या

औदार्य शिवालय फाउंडेशन’ या कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन

तळमावले/वार्ताहर : समाजकल्याण आणि आरोग्य सेवेचा पवित्र वसा घेऊन कार्यरत असणाऱ्या औदार्य शिवालय फाउंडेशन च्या नवीन कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दि.19 मार्च,2026 रोजी मस्करवाडी (काळगांव), ता.पाटण येथे अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.
‘सेवा, समर्पण आणि समाजकल्याण’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून या फाउंडेशनने ग्रामीण भागातील जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शहरासारख्या उच्च दर्जाच्या नेत्र सेवा माफक दरात किंवा मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस फाउंडेशनने याप्रसंगी बोलून दाखवला. यावेळी फाउंडेशनचे प्रेरणास्थान माणिकराव काळे, मार्गदर्शक नारायण उपरे, खजिनदार कमलेश मस्कर, संचालक गणेश मोरे, शुभांगी देसाई, कोमल होगले उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष लक्ष्मण मारुती मस्कर, उपाध्यक्ष शिवाजी गणपती मस्कर आणि सचिव चंद्रकांत किसन मस्कर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, कराडचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, काळगांव ग्रामपंचायतच्या सरपंच राखी काळे, अनिलदादा डाकवे, संदीप सावंत, बाबूभाई सुतार, कविता कचरे, तेजस्विनी माेिहिते, श्रीकांत आचरे, संजय मानुस्करे, हिंदूराव मोहिते, राजाभाऊ खराडे, अवधूत घारे, राजश्री देशमुख, हरिष काळे, युवराज काळे, हैबतराव काळे, बापूसाहेब दुधडे, सागर पाटील, योगेश डाकवे या मान्यवरांसह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
उद्घाटनानंतर बोलताना संस्थापक/अध्यक्ष लक्ष्मण मस्कर म्हणाले की, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ नेत्र तपासणीच नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, मस्करवाडी आणि परिसरातील नागरिकांनी या नवीन कार्यालयामुळे आरोग्य सेवा अधिक सुलभ होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Scroll to Top