ताज्या बातम्या

आर. एस. एस.चे भागवत साताऱ्यात आले आणि सहकार्यवाहना भेटून निघून गेले…

सातारा(अजित जगताप) : संघटन कौशल्य व राष्ट्रहिताची बांधणीआणि कट्टर हिंदुत्ववाद जोपासणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष असते. काल शनिवारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच सहावे सरसंघचालक मोहन भागवत यांनी
साताऱ्यातील संघटनेचे जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये यांची भेट घेतली. विशेष म्हणजे भाजप पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना ही बाजूला ठेवण्यात आले होते. संपूर्ण खाजगी दौरा असल्यामुळे अनेकांची भेट नाकारली.

शनिवारी दिनांक २८ मार्च रोजी
सायंकाळी सातारा शहरातील व्यंकट पुरा येथील श्री.आठल्ये यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट दिली. मोजकेच पण, निष्ठावंत तीस ते पस्तीस स्वयंसेवकांची गप्पागोष्टी करून त्यांनी घडामोडीचा कानोसा घेतला. सामान्य सातारकरांच्या अपेक्षा आणि सरकारचे धोरण याचीही माहिती घेतली. अत्यंत गोपनीय दौऱ्यामुळे प्रसारमाध्यमांनाही त्याची कल्पना दिली नाही.
सुमारे तासभर साताऱ्यात असूनही त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यां व्यतिरिक्त कोणाची भेट घेतली नाही. किंबहुना आपल्या दौऱ्यामुळे इतर कुणालाही त्रास होऊ नये. याचीही त्यांच्या पोलीस बंदोबस्त ताफ्याने काळजी घेतली होती.
सायंकाळी गजबजलेल्या सातारा शहरातील व्यंकटपुरा येथे अचानक पोलिसांचा ताफा आल्यामुळे स्थानिक लोकांनाही नवल वाटले होते. राष्ट्रीय स्वयं संघाचे सहकार्यवाह श्री सुहास आठल्ये हे सर्वांच्या परिचित आहेत. संघटनेच्या कामकाजातून त्यांनी आपली गेले अनेक वर्षांपासून ओळख निर्माण केली आहे. साक्षात सर संघचालक मोहन भागवत यांच्या आगमनाने संघाचे सर्वच उपस्थित कार्यकर्ते सुखावले होते. पंधरा वर्षांपूर्वी सातारा येथील कोटेश्वर मंदिरात सरसंघचालक मोहन भागवत यांची धावती भेट झाली होती. त्यानंतर ते प्रथमच भाजपची सत्ता आल्यानंतर साताऱ्यात येऊन सुद्धा कोणालाही भेटले नाहीत. फक्त संघटनेच्या मोजक्याच सदस्यांना त्यांनी भेट घेऊन मार्गदर्शन केले.

कर्नाटक राज्यातील बेळगाव नजीकच्या चिक्कोडी येथील लिंगायत समाजाचा कार्यक्रम आटोपून ते शनिवारी २८ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत व त्यांचा बंदोबस्ताचा ताफा सातारा शहरात आला होता. पुण्याला जाताना सातारा
शहरातील व्यंकटपुरा पेठेत राहणारे
संघाचे सातारा जिल्हा सहकार्यवाहक
संदीप आठले यांच्या घरी भेट घेण्यासाठी व संध्याकाळच्या भोजनासाठी ते खास आले होते. त्यांनी साधे भोजन म्हणजेच थालीपीठ
आणि दहीभात खाऊन समाधान व्यक्त केले. त्यानंतर सव्वा सात वाजता कडक पोलीस बंदोबस्तात ते पुण्याकडे रवाना झाले.
त्यांच्या भेटीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये. यासाठी काही स्थानिक रहिवाशांना आधीच सातारा पोलिसांकडून सूचना
तसेच केवळ रहिवाशांसाठी विशेष
पासेसही जारी केले होते.
सरसंघचालक श्री मोहन भागवत यांच्या धावत्या दौऱ्यामुळे व्यंकटपुऱ्यातील श्री. आठल्ये यांचे शेजारी राहणाऱ्या इमारतीतील रहिवाशांना दर्शन झाले. अशी माहिती रहिवाशांनी दिली.

—————————————–&–+—-+

फोटो सातारा शाळेतील व्यंकटपुरा येथे सर संघचालक श्री मोहन भागवत यांच्या ताफा

Scroll to Top