मुंबई : रावा (RAWA – Renaissance Artists and Writers Association) ही आनंद मार्ग प्रचारक संघ ची सांस्कृतिक शाखा असून, संस्कृती संवर्धन व कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. या संस्थेची स्थापना २५ जानेवारी १९५८ रोजी महान तत्त्वज्ञ व आध्यात्मिक गुरु प्रभात रंजन सरकार यांनी केली.
आज ‘रावा’ ही संस्था जागतिक स्तरावर कार्यरत असून विविध देशांमध्ये संस्कृतीचा प्रसार करत आहे. प्रभात संगीताच्या ५०१८ रचनांद्वारे सांस्कृतिक चळवळीला त्यांनी नवी दिशा दिली आहे.
दि. २८ मार्च रोजी घाटकोपर (पश्चिम) येथील एसएनडीटी कॉलेज सभागृहात ‘रावा’तर्फे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाला सारंग जगताप, आचार्य प्रणेवेशानंद अवधूत, नरेंद्र पंडित, संदीप खनुजा, आमोघसिद्ध पाटील, एच. बी. जंगम तसेच दीपक ठोंबरे सर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पत्रकारिता आणि सामाजिक सेवेत उल्लेखनीय कार्याबद्दल ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राचे पत्रकार-संपादक भिमराव बाळकाबाई हिंदूराव धुळप यांना “महाराष्ट्र मुंबई सेवा श्री” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच अनेक महंत, साधू-संत व कला रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम अधिकच भारावून गेला. कला, संस्कृती आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात अविस्मरणीय ठरला.




