नवी मुंबई : रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी “इश्काची बिजली कडाडली” हा भव्य कार्यक्रम नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिनेस्टार लावण्यवती यांच्यासह नामांकित गायक व विनोदी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नामांकित व्यापारी, उद्योजक तसेच राजकीय नेते मंडळी उपस्थित राहणार असून त्यांना विशेष व्हीआयपी पास देण्यात आले आहेत. त्यामुळे पासाशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
कार्यक्रमा दरम्यान प्रेक्षकांना कार्यक्रम आवडल्यास स्वेच्छेने आर्थिक मदत समोरील मदत बॉक्समध्ये किंवा थेट स्टेजवर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी पासेस व बुकिंगसाठी इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
साहिल गोळे – ९६५३४६००५८, प्रथमेश गोळे – ९८७०११३०५६ या कार्यक्रमाचे निर्माता श्री. साहेबराव गोळे तसेच सहनिर्माता प्रमुख श्री. गोरखनाथ यादव यांनी नवी मुंबईतील लोक कलेवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक बांधवांनी आवर्जून उपस्थित राहून तिकीट खरेदी करून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे.




