ताज्या बातम्या

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य आदर्शवत; राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ संचालक ना भरत पाटील दैनिक ललकारचे ज्ञानेश्वर शेवाळे महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी

कराड (वार्ताहर) अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य आदर्शवत असल्याचे मत राष्ट्रीय खनिज विकास मंडळाचे संचालक नामदार भरत पाटील नाना यांनी व्यक्त केले, कराड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते , यावेळी दैनिक ललकारचे पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी सामाजिक महिला मंचच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पूनम दीदी दबडे, सातारा जिल्ह्याच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विद्याताई मोरे, उपजिल्हाध्यक्ष प्रताप भनगे, जिल्हा सचिव नितीन मोरे, कराड शहर अध्यक्ष सुहास कांबळे ,वाळवा तालुका संघटक शैलेश पाटील, कडेगाव तालुका संघटक राहुल महाजन, या सर्वांचा देखील सन्मान करण्यात आला, यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात आले असून ज्या पत्रकारांना आधीस्वीकृती म्हणजे जे लाभार्थी पत्रकार आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे, आपल्या देखील पत्रकार संघाच्या पाठीशी आम्ही नेहमीच खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

Scroll to Top