ताज्या बातम्या

जावळीच्या भाजप सभापती पदासाठी राष्ट्रवादीची तटस्थ भूमिका……

मेढा(अजित जगताप): जावळी तालुक्यात भाजपच्या विरोधात मतदारांनी मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हसवे गणातील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे नातेवाईक सौ श्वेता मिलिंद शिंदे यांना निवडून आणले. त्यांनीच सभापती व उपसभापती पदाच्या निवडीच्या वेळेला तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित झाला. या राजकारणाच्या खेळीमुळे जावलीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा अस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या जावळी पंचायत समितीच्या या
निवडणुकीत भाजपचे सौरभ राजेंद्र शिंदे- कुडाळ गण, सौ. चारुशीला
पवार- सायगाव गण, गोरख महाडिक- खर्शी बारामुरे गण हे
तीन सदस्य निवडून
आले आहेत. म्हसवे गणातून सौ शिल्पा शिंदे या राष्ट्रवादी
शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आल्या आहेत. कुसुंबी
गणातून सौ सुनीता दूंदळे व आंबेघर तर्फ मेढा या गणातून
अतीश कदम मुळ राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असले शिवसेना चिन्हावर लढले. ईश्वरी चिट्टीवर निर्णय होत असतानाच राष्ट्रवादीच्या सौ श्वेता मिलिंद शिंदे यांनी तटस्थ भूमिका घेऊन भाजपच्या सभापती व उपसभापतीचे निवड निश्चित केली आहे. यामुळे भाजप विरोधात म्हसवे गणात मतदान करणाऱ्या मतदारांना एक आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. यापेक्षा भाजपचे उमेदवाराला मतदान केले असते तर बरे झाले असते असे काही मतदारांनी सांगितले. याबाबत जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याची काहींनी मागणी केली आहे.
जावली पंचायतीच्या स्थापनेपासून काँग्रेस, एस,काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी पक्षाच्या ताकतीवर सभापती व उपसभापती पद मिळवले होते. शिवसेनेचे भाऊसाहेब उभे यांना फोडून सत्तांतर केले होते .असाच काहीसा प्रकार एका सदस्याच्या तटस्थ राहण्यामुळे झाला आहे. भाजपचे निवनिर्वाचित सभापती
सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक यांचे ना.
शिवेंद्रसिंहराजे भोसले
जि.प. सदस्य वसंतराव मानकुमरे,जि.प. सदस्या
जयश्रीताई सुहास गिरी, सौ . श्वेता मिलिंद शिंदे यांच्यासाह अनेक पदाधिकारी
व कार्यकर्ते उपस्थित होते . त्यांनी अभिनंदन केले.
सभापती, उपसभापती निवडीसाठी आज विशेष सभा
सभागृहामध्ये पिठासन अधिकारी राजश्री मोरे यांचे
अध्यक्षतेखाली सभेचे सदस्य व सभागृहाचे सचिव तथा
गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, तहसिलदार
प्रविण मुगदुल, सपोनि सुधीर पाटील उपस्थित होते .सभापती पदासाठी भाजपकडून सौरभ
शिंदे तर सेना व मित्र पक्षाच्या कडून कुसुंबी गटाच्या पं.स.
सदस्या सुनिता दुंदळे यांचा अर्ज दाखल झाला होता. तर
उपसभापती पदासाठी भाजपकडून गोरख महाडीक तर
सेनेकडून सुनिता दुंदळे असे अर्ज दाखल झाल होते. आतिश कदम हे ओ.बी.सी. गणातून निवडून आल्यामुळे त्यांना डावलण्यात आले का? याबाबत आता शिवसेना व राष्ट्रवादीने खुलासा करावा. अशी मागणी होऊ लागलेली आहे. शिवसेनेच्या
सुनिता दुंदळे यांनी उपसभापती पदाचा अर्ज माघारी
घेतल्याने भाजपचे गोरख महाडीक बिनविरोध निवडून
आले. सभापती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली.
त्यामध्ये सौरभ शिंदे यांना तीन मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे
सदस्या शिल्पा शिंदे यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने सुनिता
दुंदळे यांना दोन मते मिळाली. या प्रक्रियेमध्ये भाजपचे
सौरभ शिंदे हे बहुमताने विजयी झाले.
यापूर्वी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी ची सत्ता होती. ती संपुष्टात आणण्यामध्ये राष्ट्रवादी सदस्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संपर्क साधताना संकोचित वाटत होते. त्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. या निवडीनंतर म्हसवे गणात काही भागात राष्ट्रवादीला मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये शोककळा पसरली होती.

Scroll to Top