ताज्या बातम्या

_एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर पुन्हा केंद्र सरकारची भेट घेणार,उपसभापती सचिन अहिर यांची कामगार मेळाव्यात ‌ग्वाही!

मुंबई : पदाचा उपयोग आपण कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितपणे करू,अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी येथे कामगारांच्या दसरा मेळाव्यात बोलताना दिली आणि एनटीसी गिरणी कामगारांच्या प्रश्नावर येत्या नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारला पुन्हा भेटणार आहोत, असा दिलासाही सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात दिला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने,संघटनेचा ७९ वा वर्धापनदिन सोहळा‌ आणि दसरा संमेलन विजयादशमीच्या पूर्वसंध्येला आज मनोहर मामा फाळके सहभागृहात मोठ्या थाटामाटा पार पडला.त्यावेळी उपसभापती सचिन अहिर मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी संघटनेच्या वर्धापन दिना मागील इतिहास सांगितला.
याप्रसंगी आश्वासित प्रगती योजने अंतर्गत उपसभापती सचिन अहिर यांनी राज्य सरकार नियंत्रित हाफकीन इन्स्टिट्यूटच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना १४ वर्षानंतर सुमारे ६००० रुपया यांची भरघोस पगारवाढ मिळवून दिली त्याबद्दल,हाफकीन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सचिन अहिर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने एनटीसी गिरणी कामगारां च्या थकीत पगारासाठी महिन्यापेक्षा अधिक काळ साखळी उपोषण सुरू आहे, त्याला काही तांत्रिक अडचणीमुळे भेट देता आली नाही.तथापि या प्रश्नावर वर म्हटल्याप्रमाणे निश्चितपणे आपण प्रयत्न करणार आहोत, असे सांगून उपसभापती सचिन अहिर म्हणाले,हा प्रश्न देशातील बंद एनटीसी गिरण्यांशी निगडित आहे, त्याकडे सरकारचे लक्ष वेधवे लागेल.प्रारंभी संघाचे उपाध्यक्ष सुनील बोरकर यांनी आपल्या भाषणात एनटीसी कामगारांच्या उपासमारीवर माहिती दिली.खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण,सेक्रेटरी शिवाजी काळे आणि सेक्रेटरी कुमारी ऐश्वर्या सचिन ‌अहिर,तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड,उत्तम गीते,मिलिंद तांबडे, हाफकिनाचे दीपक पेडणेकर,नितीन तिर्लोटकर,विवेक जाधव, सहकार भंडाराच्या माधुरी सावंत आदी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते.या प्रसंगी पारंपारि क सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.

Scroll to Top