ताज्या बातम्या

साताऱ्यातील राकेश जाधव यांच्या मृत्यूची चौकशीसाठी रिपब्लिकन आक्रमक

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलने व शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेणारे रिपब्लिकन कार्यकर्ते राकेश बाबुराव जाधव यांच्या उपचारानंतर झालेल्या मृत्यूची स्वतंत्र तज्ञ वैद्यकीय समितीमार्फत सखोल चौकशी करावी. अशी मागणी रिपब्लिकन पक्ष( ए )गटाने केली आहे.रिपब्लिकन नेते राकेश जाधव यांच्या निधनामुळे संपूर्ण रिपब्लिकन चळवळीला शोककळा पसरली होती.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहरा नजीकच्या प्रतापसिंह नगर मध्ये राहणारे राकेश बाबुराव जाधव वय ३२ यांना किरकोळ पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी सातारा येथील सांगळे हॉस्पिटल, विसावा नाका या ठिकाणी १७ ऑक्टोबर रोजी उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच दिनांक १९ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता राकेश जाधव मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती रुग्णालय प्रशासनामार्फत देण्यात आली. यामुळे जी व्यक्ती तब्येतीने चांगली व सशक्त होती. अशा व्यक्तीचा मृत्यू हा चुकीच्या औषध उपचारामुळे झाला. असा अनेकांना संशय आलेला आहे.
वास्तविक पाहता एखाद्या आकस्मित मृत्यू बाबत नेमके आजाराचे कारण व त्यांना वैद्यकीय केलेल्या उपचार याबाबतची पारदर्शक माहिती देणे बंधनकारक आहे . एखाद्या कार्यकर्त्यांच्या उपचाराच्या मृत्यूनंतर कोणतेही प्रकारची रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे पोटदुखी, आकडी, हृदयविकार का मेंदूला आलेली गाठ याबाबत सर्व नातेवाईक व मित्रपरिवार संभ्रम अवस्थेत आहे. तीन दिवसाच्या कालावधीमध्ये उपचार केल्यानंतर राकेश जाधव जाधव यांच्या वर एक लाख रुपयांचे बिल भरण्याची सक्ती न करता राकेश जाधव यांचा पार्थिव देह घेऊन जाण्यास कोणत्या कारणाने सांगितलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक पाहता एखाद्या चांगल्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूबाबत अनेक संशय व्यक्त करत असताना त्यांची शिववेच्छेदन करणे हे गरजेचे असताना असे काही न करता मृत्यू देह ताब्यात देणे. हीच बाब संशयस्पद वाटत आहे.
याबाबत आज रिपब्लिकन पक्षाचे दादासाहेब ओव्हाळ, विकास चंदनशिवे रामभाऊ मदाळे, सुनील ओव्हाळ ,राजेश ओव्हाळ, किरण ओव्हाळ, संदीप जाधव, दीपक गाडे, रमेश नाटेकर, अमित मोरे, बाबा तथा आनंदा ओव्हाळ, मदन खंकाळ , कुमार ओव्हाळ, विजय ओव्हाळ,सोमनाथ धोत्रे, गौतम सावंत, आईशा पटणी, दशरथ अडागळे, गणेश यादव यांच्यासह प्रतापसिंह नगर मधील ५०० ते ७०० रहिवाशी यांनी सातारा जिल्हाधिकारी तसेच क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात जाऊन निवेदन दिले . राकेश जाधव यांच्या मृत्यू बाबत सक्षम तज्ञ वैद्यकीय पत्रिका कडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

Scroll to Top