
दहिवडी(अजित जगताप): माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर या ठिकाणी प्रसिद्ध देवस्थान शंभू महादेवाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात. कोकणातून सातारा जिल्ह्यात आलेल्या पर्यटकाची महिन्याभरापूर्वी सोन्याचे ब्रेसलेट व महत्त्वपूर्ण दागिने चोरीस गेले. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार करूनही तपास थांबवल्याने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, श्री. कान्हा दुखल्या मंडवी रा. मोबाईल नंबर ८१०८२१९६६१ राहणार- चिरले तालुका उरण जिल्हा रायगड हे पर्यटनासाठी आले होते. सातारा येथील माण तालुक्यातील जागृत दैवत शिखरशिंगणापूर यांचे महात्म्य ऐकून सोमवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी शिखर शिंगणापूर येथे दर्शन घेण्यासाठी गेले होते. श्री चे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी शिखर शिंगणापूर या ठिकाणी असणाऱ्या प्रणव नर्सरी येथे रोप घेण्यासाठी थांबले. .या ठिकाणी रोपांची पाहणी करून काही रोप विकत घेतली. या कालावधीमध्ये त्यांच्या मनगटातील तुटलेल्या सोन्याच्या दोन तोळे आठ ग्रॅम ब्रेसलेट व वैद्यकीय महत्वाची कागदपत्र वाहनाच्या बैठक स्थानावर ठेवल्याची आठवण झाली. सदर वस्तू या त्यांनी स्वतःच्या वाहनात ठेवलेले ते निर्धास्त होते. त्यानंतर काही काळाने वाहनाची डिकी उघडून पाहताच या ठिकाणी त्यांच्या मालकीचे सोन्याचे ब्रेसलेट व वैद्यकीय कागदपत्र पिशवी त्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले. याबाबत प्रारंभी प्राथमिक चौकशी केली असता त्या ठिकाणी सदरच्या वस्तू सापडण्याचे कुणीही सांगितले नाही. त्यामुळे श्री मंडवी यांनी २४ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजता दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार केली. तसेच त्यानंतर दोन वेळा संबंधित पोलीस ठाण्यामध्ये स्वतः हजर राहून दागिने चोरीबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात भेट देऊन विचारणा केली. याबाबत अद्यापही याबाबत तपास लागत नाही. तसेच ज्यांच्याबाबत संशय व्यक्त केला ती समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे .असं पोलिसांनी कुठेही प्रकारची चौकशी न करता त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले. या गोष्टीला एक महिना कालावधी झाला असला तरी एवढी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा तपास केला नाही. प्रतिष्ठित व्यक्तींच्या आजूबाजूला असणारे सर्वच प्रतिष्ठित असतात का? चा सवाल आता माण तालुक्यात विचारला जात आहे.
वास्तविक पाहता शिखर शिंगणापूर येथील प्रसिद्ध असलेल्या नर्सरीमध्ये रोप विकत घेताना चार-पाच माणसं त्यावेळी हजर होती. त्यांच्याबद्दल तक्रारदार श्री मंडवी यांचा आजही संशय आहे. सदर नर्सरीच्या मालकावर त्यांनी कधीही दागिने घेतल्याचा आरोप केला नाही. साधा संशय सुद्धा घेतला नाही. परंतु, त्या ठिकाणी हजर असलेल्या लोकांनीच सदर ऐवज लंपास केले आहे. याबाबत पोलीस यंत्रणेने त्वरित तपास करून सोन्याचे ब्रेसलेट व महत्वाचे कागदपत्र देण्यासाठी सहकार्य करावे. अशी त्यांनी निवेदनाद्वारे विनंती केली आहे. ते रायगड जिल्ह्यातल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात या प्रकरणाबाबत त्यांना पोलीस यंत्रणेकडून भयानक अनुभव आलेला आहे. सध्या सणासुदीला हातामध्ये सोन्याचे ब्रेसलेट नसल्यामुळे अनेक जण विचारणा करत आहेत. याबाबत लवकर तपास व्हावा अन्यथा मला अन्य लोकशाही मार्गाने आवाज उठवावा लागेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोकणवासीय असलेले महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री योगेश भाई कदम यांनाही ते निवेदन देणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली आहे. साधे मोबाईल ताबडतोब सापडले जातात. त्याची माहिती सर्व प्रसारमाध्य मला दिली जाते. फोटोही तपास अधिकाऱ्याचा प्रसिद्ध होतो. परंतु जे दागिने व कागदपत्र सापडत नाहीत. त्याबाबत विचारणा केली असता तपास सुरू आहे. असे उडवा उडवी चे उत्तर देतात. स्थानिक पातळीवर बऱ्याच मोठे गुन्हे घडत असून त्याच्या तपासाचे प्रमाण सुद्धा नोंद घेण्यासारखे असतात. मग कोकणवासी असलेल्या भाविकाचे सोन्याचे ब्रेसलेट का सापडू शकत नाही? सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची पाळीमुळे खणून काढण्यासाठी पडल्यास न्यायालयात धाव घेऊ असे माण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. राज्याचे ग्रामीण गृहराज्यमंत्री आदरणीय योगेश भाई कदम यांनी याबाबत विचारणा करून आपल्या कोकणवासीयाचे सोन्याचे ब्रेसलेट मिळवून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात माहितीसाठी निवेदन दिले आहे. या निवेदनाचे पुढे काय झाले? हे सुद्धा समजू शकले नाही. …………………………… फोटो – शिखर शिंगणापूर येथे चोरीस गेलेले ब्रेसलेट व भाविक




