ताज्या बातम्या

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विरोध व बिनविरोधचा खेळ….

सातारा(अजित जगताप) : सहकारी क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत होते. परंतु, संचालक मंडळाच्या दहा वर्षाच्या मुदतीबाबत आर.बी.आय. ने निर्णय घेतल्यामुळे अनेकांना सामान्यांना संधी देण्याची वेळ आली. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रस्थापितांना विरोध- बिनविरोधचा खेळ करावा लागला. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरही काहींना सामोपचाराने माघार घेण्याची वेळ आल्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले होते.

गेले दोन महिन्यापासून सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये कुणाला सध्या मिळेल कुणाचा पत्ता कट होईल? याबाबत चार हात लांब राहून काहींनी अंदाज वर्तवले होते. जणू काही दरवाजा व खिडकीतून अनेकांना माहिती मिळत असल्याचा भास निर्माण केला जात होता. प्रत्यक्षात मात्र एकमेकांची भेट घेऊन चहापान करून नेते निघून जात होते. मात्र, कार्यकर्त्यांना अंदाज मांडण्यासाठी काही माध्यमांकडे पाठवले जात होते. सर्व गोष्टींचा उलगडा बुधवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता जिल्हा बँकेच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही जागांसाठी दुरंगी तिरंगी आणि चौरंगी आता सामना रंगणार आहे. जिल्हा बँकेच्या मुख्यालयामध्ये अनेक नेत्यांची भेट घेऊन प्रसारमाध्यमाने माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा, वि. का.स सेवा सहकारी संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था- सातारा—
सावंत सर्जेराव दिनकरराव (बिनविरोध)
जावळी—-रांजणे ज्ञानदेव किसन,गोळे विठ्ठल गुलाबराव
महाबळेश्वर—
राजपुरे रुपाली राजेंद्र,मोरे संजय हरिचंद्र
कराड—
पाटील उदयसिंह विलासराव,पाटील धनंजय तुकाराम
पाटण—-
पाटणकर सत्यजित विक्रमसिंह,देसाई शंभूराज शिवाजीराव
कोरेगांव—
खत्री सुनिल रवेलचंद,माने सुनिल गुलाबराव
खटाव—
मोरे नंदकुमार उर्फ नानासो महादेव( बिनविरोध)
माण—-
पोळ मनोजकुमार सदाशिवराव,गोरे शेखर भगवानराव,गोरे जयकुमार भगवानराव
खंडाळा—
गाढवे शामराव लक्ष्मणराव,गाढवे संजीव शंकरराव,भोसले अजय केशव
वाई—
वीर सत्यजीत सुरेश( बिनविरोध)
फलटण–
श्रीमंत नाईक निंबाळकर संजीवराजे विजयसिंह,नाईक निंबाळकर समशेर हिंदूराव
महिला राखीव प्रतिनिधी——
पाटील ऋतुजा राजेश (बिनविरोध)
पाटील मंगल चंद्रकांत( बिनविरोध)
अनुसुचित जाती किंवा अनुसुचित जमाती सदस्य–
चव्हाण दिपक प्रल्हाद,बडेकर रविंद्र सर्जेराव
|गायकवाड सुरेश बबन,कांबळे सत्यवान आबाजी
इतर मागासवर्गीय सदस्य—
फडतरे योगेश संभाजीराव,पाचांगणे संदीप यशवंत
विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास वर्गीय सदस्य—
वाघ सुनिल सुरेश,काळे अर्जुन चांगदेव
कृषी उत्पादक व प्रक्रीया सहकारी संस्था (सहकारी साखर कारखाने / ऑईल मिल्स/सुतगिरण्या) यांचे प्रतिनिधी–
भोसले अतुल सुरेश (बिनविरोध)
नागरी बँका / नागरी पतसंस्था / ग्रामीण बिगरशेती पतसंस्था / पगारदार नोकरांच्या पतसंस्था यांचे प्रतिनिधी—
नाईक निंबाळकर रणजीतसिंह हिंदूराव (बिनविरोध)
गृहनिर्माण सहकारी संस्था व दुध उत्पादन संस्था पशुपैदास/वराहपालन/कुक्कुटपालन शेळी मेंढी पालन संस्था—
धुमाळ सोमनाथ रामचंद्र (बिनविरोध)
औदयोगिक / विणकर व मजूर सहकारी संस्था / ग्राहक संस्था / पाणीपुरवठा सहकारी संस्था/ इतर प्रकारचे संस्था
प्रतिनिधी/व्यक्तीगत सभासद—
वाघ सुनिल सुरेश
जाधव चंद्रकांत माधवराव अशा पद्धतीने नव बिनविरोध व इतर १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. या प्रक्रियेमध्ये सध्या महायुती अंतर्गत लढाईकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पाटण- जावळी- महाबळेश्वर- माण- खंडाळा- कराड-कोरेगाव-फलटण या तालुक्यातील सोसायटीच्या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी अनेक मतदारांना सहलीचा आनंद मिळाला आहे. निवडणुकीच्या वातावरणामुळे त्यांच्या अपेक्षा आता वाढलेले आहेत. त्यामुळे घोरपड बाई तुझी पाठ मऊ असे समजून त्यांची पाठ चांगलीच खाजवावी लागणार आहे. कारण निवडणुका म्हटले की मतदारांना खुश ठेवणे. अवघड जागेचे दुखणे झालेले आहे. नरड्यात हाडूक अडकल्यासारखे धड गिळताही येत नाही आणि बाहेर काढून फेकता ही येत नाही. अशी काही उमेदवारांची अवस्था पाहण्यास मिळत आहे. ………………………………………..

फोटो–सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट (छाया- अजित जगताप सातारा)

Scroll to Top