Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भमनोज जरांगे यांच्या उपोषणाला गावकऱ्यांचा विरोध; जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला गावकऱ्यांचा विरोध; जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

प्रतिनिधी : देशभरात लोकसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता लागली असून आपल्या मतदारसंघात कोण खासदार होणार, याचीच चर्चा सुरू आहे. त्यातच, लोकसभा निवडणुकांच्या निकालांतर आपण पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी  उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र, जरागेंच्या आंदोलनास आता अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच विरोध केला आहे. त्यामुळे, जरांगे पाटील यांचं उपोषण अंतरवाली सराटी गावात होणार की ते आपला उपोषणसाठीचं ठिकाण बदलणार?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मनोज जरांगेंच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलेल्या अंतरावाली सराटी गावातील लोकांनीचा आता त्यांच्या आंदोलनास विरोध केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.   

Continues below advertisement

null

ज्या गावातून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला, ज्या गावातून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला, ज्या गावकऱ्यांच्या ताकदीमुळे मनोज जरांगे यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील मराठा समाज एकटवला, ज्या गावात मनोज जरांगे यांनी ऐतिहासिक सभा घेऊन राज्याचे लक्ष वेधले, ज्या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते शरद पवारांपासून राज ठाकरेंपर्यंतचे दिग्गज पोहोचले. आता, त्याच अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनास विरोध केला आहे. 

जरांगे यांनी 4 जूनपासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, उद्या 4 जूनला मनोज जरांगे उपोषणस्थळी जाऊन पुन्हा उपोषणाला बसतील. तत्पूर्वीच, गावकऱ्यांनी जरांगेंच्या उपोषणाला विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले आहे. प्रशासनने या उपोषणास परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली आहे. अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे यांच्या गावातील उपोषणाला उघडपणे विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर 70 गावकऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे, जरांगे यांचं उपोषण वादात सापडल्याचं दिसून येत आहे. 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments