ताज्या बातम्या

पुण्यात राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कोपरखैरणेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

नवी मुंबई दि. १ मार्च : विनर्स कराटे असोसिएशन यांच्या वतीने पुणे येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोपरखैरणे येथील शारदा विद्या मंदिर स्कूलच्या कराटे प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले.
स्पर्धेमध्ये राजवीर लेंगरे याने काथा व कुमिते प्रकारात अनुक्रमे सिल्वर व ब्राँझ पदक पटकावले. शौर्य भिलारे याने कुमिते प्रकारात ब्राँझ पदक मिळवले, तर निखिल जगदाळे याने कुमिते प्रकारात सिल्वर पदक जिंकून शाळेचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या या यशामुळे कोपरखैरणे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार DDM न्यूज चैनलचे संपादक श्री. भिमराव धुळप, समर्थ क्लासेसचे संचालक श्री. विष्णु शिंदे सर तसेच शारदा विद्या मंदिर स्कूलचे अध्यक्ष रमेश संकपाळ सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशिक्षक अंकित संकपाळ सर उपस्थित होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही असेच यश संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top