ताज्या बातम्या

डॉ. कौतिक दांडगे यांना ‘अनाथ पिंडक पुरस्कार’ प्रदान

मुंबई : द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, मुंबई प्रदेश यांच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात समाजकार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल डॉ. कौतिक दांडगे यांना प्रतिष्ठेचा ‘अनाथ पिंडक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
समाजाप्रती असलेली बांधिलकी, जनसेवेचा ध्यास आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीसाठी केलेले योगदान यांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करणारा हा सन्मान सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
समाजातील गरजू घटकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा अशा पुरस्कारांमधून मिळते. डॉ. कौतिक दांडगे यांना मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
या गौरवाबद्दल डॉ. कौतिक दांडगे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Scroll to Top