कराड : कराड येथील मर्चंट नेव्ही अधिकारी प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन करणारी एकमेव नामवंत अकॅडमी असा नावलौकिक प्राप्त आर के मरीन करीअर अकादमीचा गुणवंत कॅडेट ” ओमकार रानडे (सातारा) याची “इंजिन कॅडेट” पदी यशस्वी निवड झाल्याची माहिती संचालक राहुळकुमार खडके यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, ओमकार रानडेचे माध्यमिक शिक्षण डी. जी.कॉलेज सातारा येथून पूर्ण झाले.तर मर्चंट नेव्ही कॅडेटचे प्रशिक्षण ” इंटरनॅशनल मेरीटाईम अकॅडमी ” चेन्नई ( तामिळनाडू) येथून यशस्वी पूर्ण झाले. मर्चंट नेव्ही मध्येच करिअर घडवन्याचे ओमकारचे स्वप्न होते.समुद्रावरील धाडसी व दर्यावर्दी जीवन ,वेगवेगळे देश पाहण्याच्या संधी, उच्च राहणीमान, भरपूर पगार यामुळे शिपिंग क्षेत्र त्याला खुणावत होते. परंतु या प्रशिक्षणाचा खर्च आपणाला झेपेल का? हा प्रश्न सतत भेडसावत होता.त्याने हा मनोदय आपली आजी श्रीमती उज्वला गोडसे व आई श्रीमती आसावरी रानडे यांना बोलून दाखवला.बेताची आर्थिक स्थिती असणाऱ्या आजी व आई यांनी कितीही कष्ट करावे लागले तरी ओमकारला प्रशिक्षणाला पाठवणारच हा ठाम निर्धार केला.ओमकरला वडील नसल्याने या दोघींनी हा खर्च करणे सर्वानाच अशक्यप्राय वाटत होते.परंतु इतर कोणाकडेही लक्ष न देता हे दिव्य आपण पार पाडायचेच हा चंग दोघींनी बांधला. पुढारी पेपर मधील आर. के मरीन अकादमीचा लेख वाचून राहुलकुमार खडके यांना संपर्क केला असता..त्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली .ओमकारनेही सर्व आवश्यक त्या परीक्षा व सीडीसी प्रमाणपत्र यासास्विरीत्या मिळविले.याचाच एक परिणाम म्हणून हे यश त्यास प्राप्त झाले आहे.याचे सर्व श्रेय राहुलकुमार खडके सरांचे मार्गदर्शन व आपली आजी व आई यांचे अपार कष्ट याचेच फळ आहे.शेवटी म्हणतात ना ” जिथे प्रबळ असते तिथे कसलीही अवघड परिस्थिती असो त्यावर मात करून यशाची वाट ही गवसते.” म्हणूनच संचालक राहूलकुमार खडके यांनी त्याची पुढील सर्व जबाबदारी स्वीकारली असून ५१०००/ हजार रुपये शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राहूलकुमार खडके यांनी दिली.




