ताज्या बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

नवी मुंबई : स्वच्छता, सामाजिक न्याय आणि सुधारणांवर भर देणारे आधुनिक संत म्हणून नावजले गेलेल्या संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर श्री. दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, नगरसेविका श्रीम.माधुरी सुतार, श्रीम.सायली शिंदे, श्रीम.शैला पाटील, श्रीम.प्रिती भगत, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त श्री.अमोल पालवे, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, सहा.संचालक नगररचना श्री.सोमनाथ केकाण, मुख्य विधी अधिकारी श्री. अभय जाधव, कार्यकारी अभियंता श्री. तानाजी शिंदे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top