ताज्या बातम्या

साताऱ्यात सामान्य शिवसैनिकाच्या भेटीसाठी शिवसेना नेत्यांचे आगमन…

सातारा(अजित जगताप) : मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी व हिंदुत्वाच्या विचाराची ज्योत अखंड भारतामध्ये कायम राहावी. यासाठी झटणाऱ्या शिवसेना म्हणजे खऱ्या अर्थाने शिवसैनिकांसाठी कार्यशाळा आहे. याच शिवसेनेचे निष्ठावंत मावळे व सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव हे साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. ही बाब समजतात शिवसेना नेते व माजी आमदार दगडू सपकाळ यांनी तातडीने शिवसेनेची बैठक रद्द करून श्री जाधव यांच्या भेटीसाठी रुग्णालय गाठले. शिवसेना नेते व शिवसैनिक यांच्या ऋणानुबंध पाहून अनेकांना राजकीय संस्काराचे दर्शन घडले.
सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेला गौरवशाली यश मिळाले आहे . सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात शिवसेनेच्या उमेदवारांना सर्वसामान्य मतदारांनी मत दिली आहेत. या मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेना नेते व मान्यवरांनी सातारा जिल्ह्याचा दौरा आयोजित केला होता. मतदारांचे आभार मानत असतानाच शिवसेना जिल्हाप्रमुख श्री जाधव हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शिवसेना नेते माजी आमदार दगडू सपकाळ यांनी थेट रुग्णालय गाठले. डॉक्टर शिंदे यांच्याशी आपुलकीने चर्चा केली. गेले चार दिवस श्री जाधव हे माजी आमदार दगडू सपकाळ यांच्या संपर्कात होते परंतु ते आजारी असल्याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली नव्हती.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शिवसेनेची बैठक होत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव हे गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याबाबत माहिती घेतली असता श्री जाधव हे साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजले. माजी आमदार दगडू सपकाळ यांनी तातडीने बैठक रद्द करून रुग्णालयात धाव घेऊन श्री जाधव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. गेली वीस वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून नेते व शिवसैनिक राजकीय वाटचाल करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यातील माणुसकीचा धागा सुद्धा दिसून आला आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, विराज खराडे, एकनाथ ओंबळे, जिल्हा परिषद सदस्य सौ .कविता एकनाथ ओंबळे, जितेंद्र सपकाळ , शशिकांत गुरव, अजित जगताप व ज्ञानेश्वर पवार, विजय मायणे आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————–

फोटो — शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना शिवसेना नेते दगडू सपकाळ (छाया– निनाद जगताप)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top