ताज्या बातम्या

घोगावमध्ये संत रोहिदास मित्र मंडळाचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात; अकरावे वर्ष दिमाखात साजरे

प्रतिनिधी : कराड तालुक्यातील मौजे घोगाव येथे संत रोहिदास मित्र मंडळाच्या वतीने संत शिरोमणी संत रोहिदास महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे अकरावे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. गेली अकरा वर्षे मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून हा महोत्सव साजरा केला जात आहे.

यंदाही महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, नृत्य स्पर्धा तसेच रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अधिराज उदयसिंह पाटील बाबा, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य नितीन थोरात, प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व शंकरा पाटील आबा, पोलीस पाटील शिवाजी भावके, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश सावंत, संत रोहिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदाशिव रामुगडे, ॲड. महेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष सुभाष गोविंद धुळप, सचिव उमेश धुळप, खजिनदार तथा पत्रकार भीमराव धुळप, समाजनेते संदीप धुळप यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक एकोपा आणि प्रेरणादायी संदेश देणारा हा सुंदर सोहळा उत्साहात संपन्न झाला.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top