ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाची वाटचाल : सौ. स्वाती माने – होळमुखे यांना ‘धगधगती मुंबई’चा कर्तुत्ववान महिला पुरस्कार जाहीर

मुंबई : शिक्षण क्षेत्रात १९ वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सौ. स्वाती प्रमोद होळमुखे यांना ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त महिला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४-५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
सौ. होळमुखे या सध्या छत्रपती शिवाजी विद्यालय (इंग्रजी माध्यम) येथे प्राचार्या म्हणून कार्यरत असून महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्त पदाची जबाबदारीही त्या समर्थपणे सांभाळत आहेत. एम.ए., बी.एड. अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या सौ. होळमुखे यांनी स्कूल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा पूर्ण केला असून सध्या शिक्षणशास्त्र (Education) विषयात पीएच.डी.साठी अध्ययनरत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या १९ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवामध्ये अध्यापन, शालेय प्रशासन, शैक्षणिक नियोजन, शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी यांचा समावेश आहे. प्राचार्या म्हणून त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत शिस्त, मूल्यशिक्षण आणि आधुनिक शैक्षणिक उपक्रमांवर विशेष भर देत शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.
वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची जाणीवपूर्वक बांधिलकी आहे. महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या सक्रियपणे कार्यरत आहेत.
प्रवास, विविध संस्कृती जाणून घेणे, नवीन लोकांशी संवाद साधणे आणि संगीत ऐकणे हे त्यांचे आवडीचे विषय असून या माध्यमातून त्या स्वतःचा दृष्टीकोन अधिक व्यापक करत असतात.
“शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणणे, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करणे तसेच

Scroll to Top