सातारा(प्रताप भणगे) : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष , आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे खासदार नितीन काका पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवार,दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी खासदार नितीन काका पाटील यांचा वाढदिवस असून, या पार्श्वभूमीवर कोणत्याही कार्यकर्त्यांनी फ्लेक्स बोर्ड, जाहिराती लावू नयेत तसेच वाढदिवसानिमित्त कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करू नये, असे आवाहन काकांनी केले आहे.
तसेच उद्या वाढदिवसानिमित्त खासदार नितीन काका पाटील कोणाचेही सत्कार अथवा शुभेच्छा स्वीकारणार नाहीत. सत्कार व शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते उपलब्ध राहणार नाहीत याची नोंद सर्वांनी घ्यावी.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रती आदर व्यक्त करत, शोकभावनेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.🙏🏻




