ताज्या बातम्या

माणुसकीच्या धनाने कातर खटाव मध्ये संस्काराला मिळाले अभय..

कातर खटाव(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालानंतर गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी झाली. परंतु ,सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या कातरखटाव जि प मतदार संघात भाजप विजयी उमेदवार धनंजय चव्हाण व राष्ट्रवादी पराभूत उमेदवार अभयसिंह जगताप यांची भेट झाली. माणुसकीच्या धनाने संस्काराचेही अभय असल्याचे दिसून आले.
खटाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या कातर खटाव गटाच्या निवडणुकीमध्ये पंधरा दिवस अत्यंत संयमी व लोकशाहीला साजेस अशा पद्धतीने कर्तबगार उमेदवारांनी प्रचार केला. भविष्यात कातरखटाव जिल्हा परिषद गटासाठी कोणत्या योजना राबवणार? विकास काय करणार? याचीच परिपूर्ण माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली. तसेच मतदारांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचाही पुरवठा केला.
काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये रंगत आणली असली तरी शांतता भंग होऊ नये. याची काळजी घेण्यासाठी उमेदवार तत्पर होते. त्यांनी अनेकदा उत्साही कार्यकर्त्यांना आवर घातला.
सोमवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी वडूज या ठिकाणी मतमोजणी घेण्यात आली. यामध्ये भाजपचे उमेदवार धनंजय चव्हाण यांना १२,८३३ मते व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभय जगताप यांना १२,०५९ मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजय सानप यांना २९१ मते मिळाली.
भाजपचे उमेदवार धनंजय चव्हाण यांचा विजय झाल्यानंतर सर्वच कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक व फटाक्याची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण केली. या गर्दीतही मोठ्या मनाने राष्ट्रवादी पराभूत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी भाजपचे विजयी उमेदवार धनंजय चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांच्या मनाचा मोठेपणा पाहून खऱ्या अर्थाने लोकशाही जिंकली. आणि राजकीय हेवेदाव्याचाच पराभव झाला. असा निकाल हाती आला. त्याचे जोरदार खटाव तालुक्यात स्वागत केले जात आहे.
लोकशाहीमध्ये जय- पराजय यापेक्षाही तुम्ही कशा पद्धतीने माणुसकी व संस्कार दाखवता यावर बरेच काही अवलंबून आहे. या दोन्ही नेत्यांची आता संपूर्ण सातारा जिल्ह्यात कौतुक होत आहे. दोन्ही नेत्यांना सुज्ञ मतदारांनी आपले बहुमूल्य मत दिल्याबद्दल मतदारांनी सुद्धा मनापासून समाधान व्यक्त केले आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरलेले आहे. संघर्ष हा विकास कामासाठी असावा परंतु व्यक्तिगत हिरवे दावे साठी नसावा हे या गोष्टीने सिद्ध झाले आहे.

____________________

फोटो -कातरखटाव जिल्हा परिषद गटात भाजप विजयी उमेदवार धनंजय चव्हाण यांचे स्वागत करताना राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप (छाया- अजित जगताप ,वडूज)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top