ताज्या बातम्या

श्री कुसुंबी यात्रेनिमित्त दीड लाख भाविकांनी श्री.देवी दर्शनाचा घेतला लाभ…

सातारा(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या श्री. काळेश्वरी तथा काळुबाई देवी कुसुंबी येथील वार्षिक यात्रेनिमित्त दीड लाख भाविकांनी श्री. देवीची पूजा अर्चा करून दर्शन घेतले. यावेळी उत्तमरीत्या भाविकांची व्यवस्था झाल्याने खऱ्या अर्थाने भाविकांनीही श्री काळेश्वर देवी यात्रा कमिटी व ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेचे आभार मानले.
दरवर्षी श्री. काळेश्वरी तथा श्री काळुबाई देवीची यात्रा ही नियमाप्रमाणे संकष्टी चतुर्थीला भरते. परंतु, यंदाच्या वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा व कार्यकर्ते निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये. यासाठी यात्रा दिनांक ९ ते १० फेब्रुवारी रोजी घेण्याचा सामुदायिक निर्णय घेण्यात आला. त्याला भाविकांनीही उदंड प्रतिसाद दिला.
वी या यात्रेनिमित्त श्री काळेश्वर देवीची सासनकाठी श्री.च्या गाभाऱ्यातील राऊळ मध्ये नेवैद्य व श्रीफळ वाढवण्यात आले. भैरोबाची पालखी व काळुबाई बहिणींची पालखी तसेच गांजे, मालचोंडी येथील कुसुंबीतील श्री काळेश्वरी देवीची व श्री भैरवनाथ गाठीभेटी, छबिना आणि महत्वाचे म्हणजे कुसुंबीच्या शिवतेज ग्रुपच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या वार्षिक यात्रेनिमित्त महावितरण सेवा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जादा बसेस व अग्निशमन दल व पोलिस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांनी घेतलेले परिश्रम घेतले .
श्री काळेश्वर देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त पुणे, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, रायगड ,पनवेल, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बार्शी, धाराशिव, कर्नाटक राज्यातूनही भाविक आले होते. विशेषतः महिला भाविक वर्गाची गर्दी लक्षणीय होती. यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिरवी साडी- चोळी तसेच धार्मिक साहित्याची खरेदी जोमात झाली.

श्री क्षेत्र कुसुंबी या ठिकाणी मंदिर परिसरात भाविकांनी श्रीफळ वाढवू नये. अशी सक्त सूचना करूनही श्रीफळ वाढवण्यासाठी गर्दी झाली होती. तरीही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. विशेषता सरपंच मारुती चिकणे, पोलीस पाटील एकनाथ सुतार, ट्रस्टचे किसनराव चिकणे, विजय वेंदे ,संतोष चिकणे, सूर्यकांत चिकणे, देवेंद्र सुतार, शंकर बेंद्रे, श्रीकांत चिकणे, उपसरपंच निवृत्ती मोरे व सामाजिक कार्यकर्ते संजय गाडे, माने यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या यात्रेनिमित्त दीड लाख भाविकांनी श्री चे दर्शन घेऊन सर्वांच्या सुख समृद्धीची ही प्रार्थना केली. काहींचे नवस पूर्ण झाल्याबद्दल भक्ती भावाने त्यांनी पूजाअर्चा केली व नेवैध दाखवला. देणगी दिली.
व यावेळी पुरणपोळीच्या नेवैध दाखवून भाविकांनी ही आस्वाद घेतला. अनेक ठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आले होते. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने उत्तम सुविधा केल्याबद्दल भाविकांनीही आभार मानले. तसेच मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. तरुणाईने सेल्फी काढण्यासाठी मनमुराद आनंद घेतला. एक चांगले दर्जेदार पर्यटन स्थळ आकार घेत असल्याने खऱ्या अर्थाने श्री. काळेश्वरी देवी सर्वांना पावली आहे .
.______________________

फोटो— श्री काळेश्वरी देवी व भाविकांची लागलेली रांग आणि नारळ न वाढवण्याची केलेली सूचना…( छाया– निनाद जगताप, कुसुंबी)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top