ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

कांदाटी खोऱ्यात बोट सेवेची पाहणी; विकासासाठी कटिबद्ध – नवनिर्वाचित सदस्य संकपाळ व मोरे यांची ग्वाही

तापोळा(नितीन गायकवाड) : तळदेव गटातून प्रचंड बहुमताने निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य अजित दादा संकपाळ आणि संजय मोरे यांनी कांदाटी खोऱ्यातील अतिदुर्गम भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या बोट सेवेची पाहणी करून प्रवाशांशी संवाद साधला व त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
या दौऱ्यावेळी जिल्हाप्रमुख विशाल भाऊ संकपाळ, सचिन कदम, किरण माने, अमृत जंगम आदी पदाधिकारी उपस्थित होते. कांदाटी खोऱ्यातील दुर्गम भागातील मतदारांनी दिलेल्या प्रचंड प्रेम व मताधिक्यामुळे हा विजय शक्य झाल्याची भावना व्यक्त करत संकपाळ आणि मोरे यांनी मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले.
“इथून पुढे या विभागाचा सर्वांगीण विकास नामदार मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक तत्पर आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले.
युवा सेना तालुकाप्रमुख विशाल भाऊ संकपाळ यांनीही नव्या पिढीला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. “मिळालेल्या या संधीचे आम्ही सोने करू आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या स्वप्नातील तालुक्याचा सर्वांगीण विकास घडवून आणू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Scroll to Top